AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला मनोज वाजपेयीचा ‘इन्स्पेक्टर झेंडे’ चित्रपट पाहायचा विचार करताय? आधी रिव्ह्यू पाहा

नेटफ्लिक्सवरील "इंस्पेक्टर झेंडे" हा मनोज वाजपेयीचा चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून तिहार तुरुंगातून पळून गेलेल्या धोकादायक सिरीयल किलरला पकडण्याच्या इन्स्पेक्टर झेंडेच्या प्रयत्नांची ही कथा आहे. अनेक मराठी कलाकारांची दमदार टीमही आहे. तुम्हीही हा चित्रपट पाहाण्याचा विचार करत असाल तर आधी हा रिव्ह्यू नक्की पाहा.

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला मनोज वाजपेयीचा 'इन्स्पेक्टर झेंडे' चित्रपट पाहायचा विचार करताय? आधी रिव्ह्यू पाहा
Inspector Zende, Manoj Bajpayee Netflix Thriller, Review & CastImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Sep 07, 2025 | 12:48 PM
Share

नेटफ्लिक्सवर सध्या चर्चा आहे ती ‘इन्स्पेक्टर झेंडे’ चित्रपटाची. जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर आला होता तेव्हा सर्वांनाच चित्रपट रिलीज होण्याची उत्सुकता होती. आता चित्रपट रिलीज झाला आहे. मराठमोळी स्टार कास्ट अन् मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर हिंदी प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सर्व कलाकरांमध्ये असणारा एक हुकमचा एक्का म्हणजे अर्थातच मनोज वाजपेयी. जिथे हा अभिनेता असतो तिथे धुमाकूळ असणारचं. हा चित्रपट 5 सप्टेंबरला रिलीज झाला आहे. तसेच चित्रपटात मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.

चित्रपटाची कथा

हा चित्रपट सत्य घटनेपासून प्रेरित आहे. तिहार तुरुंगातून पळून जाऊन खून करणाऱ्या धोकादायक सिरीयल किलर कार्ल भोजराजला पकडण्याचे आव्हान इन्स्पेक्टर मधुकर झेंडे (मनोज वाजपेयी)ला दिलं जातं. हा इन्स्पेक्टर कामात जितका चोख तेवढाच तो एक फॅमिली मॅनही दाखवला आहे. चित्रपटात मुंबईतील 70 ते 80 च्या दशकातील मुंबईला जिवंत करतो.

भूमिका

मनोज वाजपेयी पोलीस अधिकारी अर्थात इन्स्पेक्टर झेंडेंची भूमिकेत आहे. अतिशय हुशार आणि मुंबई पोलिसांची सान राखण्यासाठी, त्या किलरला पकडण्यासाठी घेत असलेली मेहनत दिसून येते. नेहमीप्रमाणे मनोज वाजपेयीची संवाद डिलिव्हरी आणि टायमिंग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कार्ल भोजराजच्या भूमिकेत अभिनेता जिम सरभ आहे. त्याने देखील त्याची भूमिका देखील फारच इंट्रेस्टिंग आहे.

दमदार स्टारकास्ट

मनोज वाजपेयी, भालचंद्र कदम, सचिन खेडेकर आणि गिरीजा ओक, ओकांर राऊत असे दमदार कलाकार या चित्रपटात पाहायला मिळतात.

चित्रपटातील सस्पेन्स

चित्रपट पाहताना सस्पेन्स मात्र शेवटपर्यंत कायम राहतो. किलरला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी लढवलेली युक्ती पाहायला नक्कीच रंजक वाटते. तसेच चोर-पोलिसचा हा खेळ पाहताना प्रेक्षकांन मजा येणार आहे.

दिग्दर्शन आणि तांत्रिक बाबी

दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी चित्रपटाची कथा फार किचकट न करता हलकेफुलके ट्रीट केलं आहे. मुंबईतील जुने रस्ते, पोलिस स्टेशन आणि त्या काळातील स्थानिक जीवन प्रत्यक्ष दाखवण्यात आले आहे. पार्श्वसंगीतामुळे चित्रपटातील थरार आणि सस्पेन्स वाढतो. तसेच चिन्मय मांडलेकरांनी ज्यापद्धतीने कथेतील सहजता टीकवून ठेवली आहे त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट कंटाळवाणा वाटत नाही.

‘इन्स्पेक्टर झेंडे’ प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच करतो. त्यात सस्पेन्स आहे आणि कॉमेडी देखील. मनोज वाजपेयींच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नाही.

रेटींग- 4 स्टार

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...