वयाच्या 61 व्या वर्षी आमिरने तिसऱ्यांदा केला साखरपुडा? 131 कारागिरांनी बनवली खास अंगठी; लागले 363 तास

अभिनेता आमिर खान गेल्या काही महिन्यांपासून गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. आता या दोघांनी साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गौरीसाठी आमिरने अत्यंत खास अंगठी बनवून घेतली आहे.

वयाच्या 61 व्या वर्षी आमिरने तिसऱ्यांदा केला साखरपुडा? 131 कारागिरांनी बनवली खास अंगठी; लागले 363 तास
Aamir Khan and Gauri Spratt
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 24, 2026 | 3:27 PM

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान तिसऱ्या लग्नाच्या तयारीत असल्याचं दिसतंय. वयाच्या 61 व्या वर्षी त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी साखरपुडा केल्याची जोरदार चर्चा आहे. आमिरने त्याच्या 60 व्या वाढदिवशी गौरीबद्दलचं नातं जगजाहीर केलं होतं. त्यानंतर विविध कार्यक्रमांमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. त्यानंतर आता आमिर आणि गौरीच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यामागचं कारण म्हणजे आमिरने नुकतंच गौरीसाठी दोन अत्यंत खास आणि दुर्मिळ रत्नांच्या अंगठ्या बनवून घेतल्याचं कळतंय. या अंगठ्या जगातील सर्वांत मौल्यवान रत्नांपासून तयार करण्यात आल्या आहेत.

आमिरने गर्लफ्रेंडसाठी ज्या अंगठ्या बनवून घेतल्या आहेत, त्या बनवण्यासाठी कारागिरांना अनेक तास लागले. ‘क्वीन’ (QWEEN) या लक्झरी ज्वेलरी ब्रँडच्या या अंगठ्या असून त्यांनी अद्याप अधिकृतपणे लाँचही केले नाहीत. त्याआधीच आमिर त्यांचा ग्राहक बनला आहे. गौरी आणि आमिरला नुकत्याच एका कार्यक्रमात एकत्र पाहिलं गेलं, तेव्हा तिच्या बोटात फिकट निळ्या रंगाची ही सुंदर अंगठी पहायला मिळाली होती. आमिरने बनवून घेतलेल्या दोन अंगठ्यांपैकीच ही एक असल्याचं समजतंय. प्रेम एकाच भावनेनं व्यक्त करता येत नाही, असं आमिरचं मत असल्याने त्यामुळेच त्याने दोन अंगठ्या निवडल्या आहेत. या खास अंगठ्यांमध्ये ॲक्वामरीन (निळा खडा) आणि माणिक (लाल खडा) जडवलेले आहेत.

पहिल्या अंगठीत ब्राझीलमधील एक चमकदार निळा ॲक्वामरीन असून त्याच्याभोवती हिरे जडलेले आहेत. तर दुसऱ्या अंगठीत मादागास्करमधील एक उत्तम दर्जाचा माणिक आहे. या दोन्ही रत्नांचं स्वत:चं वैशिष्ट्यपूर्ण अर्थ आहेत. माणिक हे प्रेम आणि उत्कटतेचं प्रतीक आहे, तर ॲक्वामरीन हे शांती, स्पष्टचा आणि भावनांचं प्रतीक आहे. ही अंगठी सोन्यात जडवलेली असून तिच्याभोवती 40 हिरे आहेत. ती तयार करण्यासाठी तब्बल 363 तास लागले आणि 131 कारागिरांनी एकत्र येऊन ही अंगठी घडवली आहे. माणिक रत्नाची अंगठी घडवण्यासाठी 812 तास लागले.

गौरी स्प्रॅटच्या हातातील या सुंदर अंगठीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. आमिर खानने ही खास अंगठी तिच्यासाठी बनवून घेतली आहे. परंतु ही साखरपुड्याची अंगठी नसून गौरीला दिलेली एक अनमोल भेट असल्याचं स्पष्ट झालं आहे. आमिर आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट हे सध्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. आमिरचा दोन वेळा घटस्फोट झाला असून आपल्या साठाव्या वाढदिवशी त्याने गौरीसोबतचं नातं माध्यमांसमोर जाहीर केलं होतं. गौरीला सहा वर्षांचा मुलगासुद्धा आहे. आमिर 60 वर्षांचा असून गौरी सध्या 46 वर्षांची आहे. म्हणजेच या दोघांमध्ये जवळपास 14 वर्षांचं आहे.

Follow Us