AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jahnavi Killekar : बिग बजेट ‘रामायण’ फेम अभिनेत्यासोबत झळकणार जान्हवी किल्लेकर, अभिनेत्रीच्या नव्या सिनेमाची घोषणा, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकर ट्रोलिंगमुळे चर्चेत असते. मात्र, आता अभिनेत्री तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आली आहे. जान्हवी किल्लेकर लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Jahnavi Killekar : बिग बजेट 'रामायण' फेम अभिनेत्यासोबत झळकणार जान्हवी किल्लेकर, अभिनेत्रीच्या नव्या सिनेमाची घोषणा, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
| Updated on: Oct 05, 2026 | 3:28 PM
Share

मालिका, चित्रपटांतील अभिनयाद्वारे घरोघरी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आता ‘मिरांडा वॉर्निंग’ या चित्रपटात दिसणार आहे. अत्यंत रंजक भूमिकेतून जान्हवी प्रेक्षकांसमोर येणार असून, २७ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

‘मिरांडा वॉर्निंग’ सिनेमाबद्दल

सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज मार्फत ‘मिरांडा वॉर्निंग’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे तर अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटच्या सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रच्या कल्पक जोशी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी या पूर्वी २०२३ मध्ये ‘गेट-टुगेदर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर ‘मिरांडा वॉर्निंग’ या चित्रपटातून त्यांनी वेगळा प्रयोग केला आहे. रवींद्र मठाधिकारी, सायली मठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे.

आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत 

हेरिटेजवाडी नावाच्या फार्महाऊसवर एक खूनाची घटना उघडकीस येते आणि त्यानंतर एक थरारक शोध सुरू होतो, या शोधात काय काय घडतं, याची रंजक गोष्ट ‘मिरांडा वॉर्निंग’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारे एका रफटफ पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. आदिनाथ कोठारे ‘रामायण’ या हिदी सिनेमामुळेही चर्चेत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेन्स, थ्रिलर प्रकारातील चित्रपटा यापूर्वी झाले आहेत. आता ‘मिरांडा हाऊस’ या चित्रपटातून उत्कृष्ट कथानक, कसलेले कलाकार असलेली तांत्रिकदृष्ट्या सक्षम कलाकृती पहायला मिळणार आहे.

‘भाग्य दिले तू मला’सारखा टीव्ही मालिकेतून जान्हवी किल्लेकरला लोकप्रियता मिळाली. बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून तिची लोकप्रियता आणखी वाढली. आता जान्हवी पुन्हा एकदा अभिनेत्री ‘मिरांडा हाऊस’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येत आहे. सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात जान्हवी किल्लेकरसारख्या अभिनेत्रीचं असणं उत्सुकता वाढवणारं आहे. जान्हवीची भूमिका नेमकी काय आहे, याबद्दलही उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.  त्यामुळे ‘मिरांडा हाऊस’ चित्रपटाविषयीची सर्व उत्तरं मिळवण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Follow Us
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न, विरोध मागे घेऊन प्रचारात सक्रिय
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
8 तास ड्युटी, अन्...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर राऊतांच फडणवीसांना
Sanjay Raut : 8 तास ड्युटी, अन् 16 तास...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर संजय राऊतांचं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत..
MVA : वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत थेट मैदानात एंट्री
10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील....
Sangli : 10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ, व्हिडिओ बघाच
ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई
Gyanesh Kumar Hearing Update : ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई नाकारली, कारण...
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
Chitra Wagh vs Rohit Pawar : लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद