Javed Akhtar: आधी अभिजीत दीपकेला पाठिंबा आणि आता टीका? जावेद अख्तर यांनी दिले स्पष्ट उत्तर

Javed Akhtar: सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये जावेद अख्तर यांच्या हवाल्याने असे म्हटले गेले होते की अभिजीत दीपके दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ‘खेळणे’ आहेत. तसेच अनेक आरोप करण्यात आले होते. आता यावर जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Javed Akhtar: आधी अभिजीत दीपकेला पाठिंबा आणि आता टीका? जावेद अख्तर यांनी दिले स्पष्ट उत्तर
Javed Akhtar and Dipke
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 06, 2026 | 8:32 AM

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे सध्या देशभरात चर्चेत आहेत. दीपके यांनी जंतर मंतर येथे केलेल्या आंदोलनाला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला. त्यामध्ये प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांचा देखील समावेश होता. आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये जावेद अख्तर यांनी अभिजीत दीपके यांच्यावर टीका केल्याचे बोलले जात आहे. आता यावर जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले जाणून घ्या…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये जावेद अख्तर यांनी अभिजीत दीपके यांच्यावर टीका केली आणि त्यांना कमी लेखले असे म्हटले होते. आता या पोस्टवर स्वत: जावेद अख्तर यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ही पोस्ट शेअर करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

Loading...

काय आहे जावेद अख्तर यांची पोस्ट?

“मी जावेद अख्तर सर्वांना सांगू इच्छितो की, मी सरन्यायाधीशांवर टीका केली आहे आणि अभिजीत दीपके यांना बदनाम केले आहे, असा सोशल मीडियावर पसरलेला खोटा संदेश पूर्णपणे खोटा आहे. मला आश्चर्य वाटते की जे दीपके आणि सरन्यायाधीशांना विरोध करत आहेत, त्यांना माझ्यासारख्या व्यक्तीकडून विश्वासार्हता मिळवण्याची गरज का भासते!! ही काय अवस्था झाली आहे??? दुःखद” या आशयाची पोस्ट जावेद अख्तर यांनी केली आहे.

व्हायरल मेसेजमध्ये चुकीचा दावा – जावेद अख्तर

जावेद अख्तर म्हणाले की मेसेजमध्ये चुकीचा दावा केला गेला होता की त्यांनी CJPवर टीका केली आणि दीपके यांच्याबद्दल अपमानास्पद गोष्टी सांगितल्या. व्हायरल पोस्टमध्ये अख्तर यांच्याशी संबंधित राजकीय बाबी सांगितल्या गेल्या होत्या. एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की अख्तर यांनी अभिजीत दीपके आणि CJP ची खरी स्थिती सर्वांसमोर आणली आहे.

काय होती व्हायरल पोस्ट?

व्हायरल पोस्टमध्ये पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या हवाल्याने असे म्हटले गेले होते की अभिजीत दीपके दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ‘खेळणे’ आहेत आणि कॉकरोच जनता पार्टी भाजपविरुद्ध अजेंडा चालवत आहे. व्हायरल मेसेजमध्ये हाही दावा करण्यात आला होता की CJP ने सुरुवातीला NEET पेपर लीकचा मुद्दा उपस्थित केला होता, पण नंतर ते निवडणूक आयोग, स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) आणि बांगलादेशी मुस्लिमांकडे वळवले. जावेद अख्तर यांनी पोस्ट करत हा सर्व गोष्टी फेक असल्याचे म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us