Nana Patekar: यमराजही रडला! जयवंत वाडकरांकडून नाना पाटेकरांना काळीज पिळवटून टाकणारी आदरांजली

Nana Patekar: सध्या सोशल मीडियावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या जयवंत वाडकर आणि सागर कारंडे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नानांसमोर यमराजही रडला असल्याचे दिसत आहे.

Nana Patekar: यमराजही रडला! जयवंत वाडकरांकडून नाना पाटेकरांना काळीज पिळवटून टाकणारी आदरांजली
Nana Patekar
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 9:59 AM

चित्रपटसृष्टीमधील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले. गोव्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 75व्या वर्षीही नाना अतिशय फिट अभिनेते म्हणून ओळखले जात होते. मात्र, नानांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता नाना पाटेकर यांना एका कार्यक्रमात त्यांच्या जवळचा मित्र जयवंत वाडकर यांनी आंदरांजली वाहिली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ पारितोषिक वितरण समारंभ आणि ‘वेलिंग-खातू गणेशमूर्तिकार पुरस्कार’ वितरण समारंभानिमित्त ‘जल्लोष महा उत्सवाचा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अभिनेते जयवंत वाडकर आणि सागर कारंडे यांनी नानांना आंदरांजली वाहिली.

Loading...

काय आहे व्हिडीओ?

या कार्यक्रमातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जयवंत वाडकर हे यमराजाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर सागर कारंडेने अभिनेते नाना पाटेकर यांचे पात्र साकारले आहे. नानांचा जीवनप्रवास संपल्यानंतर त्यांना पृथ्वीवरून नेण्यासाठी स्वतः यमराज खाली येतो. मात्र, नानांच्या समोर आल्यावर यमराजाला त्यांच्या ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून केलेल्या अफाट समाजकार्याची माहिती मिळते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदतीची जाणीव होते. त्यामुळे नानांना घेऊन जात असताना यमराजाच्या देखील डोळ्यात पाणी येते. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पानावळे आहेत.

प्रेक्षकांचा कंठ आला दाटून

दर नानांची भूमिका साकारणारा सागर कारंडे यमराजाला त्यांच्या आवडीनिवडींविषयी सांगताना दिसत आहे. एएए.. काय झालं? वरती कॅरम बोर्ड आहे ना? मला कॅरमबोर्ड खेळायला फार आवडतो असे सागर कारंडे बोलताना दिसतो. हे स्कीट अनेकांचा कंठ दाटून आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us