एखादी व्यक्ती आपल्या आयुष्याचा भाग बनते म्हणजे नेमकं काय? या मराठी गाण्यात दडलंय उत्तर!

Popular Marathi Song : या मराठी गाण्याचे लाखो चाहते आहेत. चित्रपटही प्रचंड गाजला होता. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? याचं उत्तरही हे गाणं देतं. यूट्यूबसह इतरही अनेक प्लॅटफॉर्मवर हे गाणं प्रसिद्ध आहे. अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये टॉपला वाजतं.

एखादी व्यक्ती आपल्या आयुष्याचा भाग बनते म्हणजे नेमकं काय? या मराठी गाण्यात दडलंय उत्तर!
Jeev Rangla song
Image Credit source: social media
| Updated on: Oct 25, 2026 | 5:08 PM

प्रेमाची ओढ, मनातली हुरहूर आणि आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याचं स्वप्न… या सगळ्या भावना एका गाण्यातून अनुभवायला मिळतात. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जोगवा’ चित्रपटातील ‘जीव रंगला’ हे गाणं आजही संगीतप्रेमींच्या मनात घर करून आहे. हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या सुरेल आवाजाने सजलेल्या या गाण्याची लोकप्रियता आजही टिकून आहे.

प्रेमाची भावना शब्दांत मांडणं सोपं नसतं. मात्र, ‘जीव रंगला’ या गाण्यातून प्रेमातील ओढ, समर्पण आणि आपल्या माणसाच्या सहवासात मिळणारा आनंद सुरेल पद्धतीने व्यक्त झाला आहे. त्यामुळेच हे गाणं ऐकताना अनेकांना आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीची आठवण होते.

Loading...

गाण्याला हरिहरन आणि श्रेया घोषाल यांचा आवाज लाभला आहे. अजय-अतुल यांचं संगीत आणि संजय कृष्णाजी पाटील यांचे शब्द यामुळे या गाण्याला वेगळीच उंची मिळाली. दोन्ही गायकांच्या आवाजातील भावपूर्णता प्रेमातील नाजूक भावना प्रभावीपणे मांडते.

‘जोगवा’ चित्रपटात उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजीव पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सामाजिक रूढी-परंपरा आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘जीव रंगला’ हे गाणं प्रेमाच्या भावनांना वेगळा आयाम देतं.

काही गाणी कितीही वर्षे झाली तरी मनातून जात नाहीत. ‘जीव रंगला’ हे त्याचं उदाहरण आहे. गाण्यातील शब्द, संगीत आणि गायकांचे स्वर यांचा सुंदर मेळ आजही श्रोत्यांना भावतो. त्यामुळेच मराठी प्रेमगीतांच्या यादीत या गाण्याचं स्थान कायम आहे. या गाण्याला आज यूट्यूबवर 2.9 कोटी व्ह्यूज आहेत.

जीव रंगला गाण्याचे बोल

जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू

जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू

पैलतीरा नेशील साथ मला देशील काळीज माझं तू

सुख भरतीला आलं नभं धरतीला आलं पुनवंचा चांद तू

जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू

जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू

चांद सुगंधा येईल रात उसासा देईल

सारी धरती तुझी रुजव्याची माती तू

खुळा आभाळ ढगाळ त्याला रुढींचा इटाळ

माझ्या लाख सजणा ही कांकणाची तोड माळ तू

खुळं काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण

तुझ्या पायावर माखेल माझ्या जन्माचं गोंदण…

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us