हे गाणं वाजताच अनेकांचे पाय आपोआप थिरकू लागतात, 38 वर्षानंतरही प्रचंड क्रेझ, ऐकताच लोक..

38 वर्षांपूर्वीचं हे गाणं लग्नात वाजलं की आपोआप पाहुण्याचे पाय ठेका धरायचे. कोणताच व्यक्ती डान्स केल्याशिवाय आणि गाणं गुणगुणल्याशिवाय शांत बसत नाही. आजही या गाण्याची क्रेझ कायम.

हे गाणं वाजताच अनेकांचे पाय आपोआप थिरकू लागतात, 38 वर्षानंतरही प्रचंड क्रेझ, ऐकताच लोक..
| Updated on: Sep 13, 2026 | 3:07 PM

लग्नसोहळा आणि हिंदी गाणी यांचं नातं खूप जुनं आहे. लग्नातील संगीत, डान्स किंवा वरात असो, काही ठराविक गाणी वाजली की वातावरणात आपोआप उत्साह संचारतो. अशाच लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री मंदाकिनी आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्यावर चित्रित झालेलं ‘जूली जूली’ हे गाणं.

1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जीते हैं शान से’ या चित्रपटातील हे गाणं आजही लग्नसमारंभ आणि पार्ट्यांमध्ये मोठ्या उत्साहात वाजवलं जातं. विशेषतः वरातीमध्ये ‘जूली जूली’ सुरू होताच अनेकांचे पाय आपोआप थिरकू लागतात. गाण्याच्या तालावर नाचणाऱ्या वरातीचा उत्साह वाढवण्याचं काम हे गाणं आजही करतं.

मंदाकिनीचं सर्वात सुपरहिट गाणं

80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मंदाकिनीची विशेष ओळख होती. ‘जीते हैं शान से’ या मल्टीस्टारर चित्रपटातील तिच्या भूमिकेपेक्षा ‘जूली जूली’ या डान्सिंग नंबरची अधिक चर्चा झाली. मंदाकिनी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या जोडीवर चित्रित झालेल्या या गाण्याने त्यावेळी प्रेक्षकांची मोठी दाद मिळवली.

या कल्ट गाण्याला अनु मलिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी आवाज दिला होता. विशेष म्हणजे अनु मलिक यांनी या गाण्याला संगीतही दिलं होतं, तर प्रसिद्ध गीतकार इंदिवर यांनी त्याचे बोल लिहिले होते. दमदार संगीत, ठेका धरायला लावणारी चाल आणि कलाकारांचा डान्स यामुळे हे गाणं आजही ताजंतवानं वाटतं.

4 दशकांनंतर गाण्याची क्रेझ कायम

‘जीते हैं शान से’ हा चित्रपट आणखी एका कारणासाठी विशेष ठरला. या चित्रपटात गोविंदा, संजय दत्त आणि मिथुन चक्रवर्ती हे तीन दिग्गज कलाकार एकत्र दिसले होते. या तिघांना एकाच चित्रपटात पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली आणि त्यामुळेही हा चित्रपट लक्षात राहिला.

चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास चार दशके झाली असली तरी ‘जूली जूली’ या गाण्याची लोकप्रियता अद्याप कायम आहे. लग्नाच्या वरातीपासून पार्टीपर्यंत आजही हे गाणं ऐकायला मिळतं. त्यामुळे 80 च्या दशकातील हे गाणं केवळ एक डान्स नंबर न राहता लग्नसोहळ्यांच्या जल्लोषाचा एक भाग बनलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us