AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut : नापास झालेल्या…कंगना रणौतची राहुल गांधींवर टीका, नवा वाद पेटणार?

Kangana Ranaut On Rahul Gandhi : दिल्लीतील सीजेपी आंदोलनावर कंगना रणौतनं भाष्य केलं असून अभिनेत्रीनं राहुल गांधींवर टीका केली आहे.

Kangana Ranaut : नापास झालेल्या...कंगना रणौतची राहुल गांधींवर टीका, नवा वाद पेटणार?
| Updated on: Oct 10, 2026 | 3:56 PM
Share

दिल्लीतील जंतर मंतर येथे सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. पोलीस आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. कंगना रणौतनं या गंभीर विषयावर आपलं मत व्यक्त केलं आहे. तिनं राहुल गांधींवरही निशाणा साधला असून या आंदोलनांबद्दल कंगना काय म्हणाली, जाणून घेऊया. माध्यमांशी बोलताना कंगना रणौत दिल्लीतील आंदोलनांबद्दल म्हणाली, ‘बघा, गद्दार, दहशतवादी आणि आंतरराष्ट्रीय कटकारस्थानं सध्या आपल्या देशासाठी एक खूप गंभीर समस्या बनली आहेत. कारण काहीही असो, देश आणि त्याचे नागरिक कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करत आहेत.’

‘पण आज जसं आपण प्रभू रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला जातो. प्रभू राम आणि प्रभू हनुमानाचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे, त्यामुळे बघा किती शक्ती आपल्याला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सर्व भारतीय एकमेकांच्या पाठीशी उभे आहेत. अनेक लोक या देशद्रोही शक्तींना उघडकीस आणण्यात गुंतले आहेत. मी म्हणते, पोलिसांना विसरा, जनता स्वतःच त्यांना पकडून चोप देईल. कारण जनता संतप्त झाली आहे.’

कंगनाची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधींवर टीका करताना कंगना म्हणाली, ‘राहुल गांधींना राष्ट्रपतींना भेटून आक्षेपार्ह गोष्टींची तक्रार करण्याचा अधिकार आहे. आमच्या वर्गातही असंच घडायचं. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना वाटायचं की, पास झालेल्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका वेगळी होती, किंवा शिक्षकांचा त्यांच्यावर काहीतरी राग होता. निवडणुकांपासून ते एबीव्हीपीपर्यंत, भाजप सर्व काही जिंकत आहे. आता कोल्ह्याला द्राक्ष आंबट झाली आहेत,  संपूर्ण देश त्यांच्यावर हसतोय.’

सीजेपी आणि अनेक विद्यार्थी संघटनांनी केलेलं हे आंदोलन मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनातील (SIR) अनियमिततेच्या विरोधात आहे. आंदोलकांची मागणी आहे की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. सरन्यायाधीशांनी ७ ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांना आंदोलनाबद्दल माहिती दिली. परंतु पोलिसांनी सांगितलं की, मागील आंदोलनांमध्ये अटींचं पालन न केल्यामुळे परवानगी दिली जात नव्हती.

Follow Us
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...