Bigg Boss 20 : कोण असेल ‘बिग बॉस 20’ च्या घरातील पहिलं कपल कोण? सलमान खानसमोर फुलली ‘लव्हस्टोरी’

Bigg Boss 20 : विकेंड का वारच्या रविवारचा एक प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये सलमान खान याच्यासमोर एका स्पर्धकाने कनिका मान हिला प्रपोज करताना दिसत आहे... व्हिडीओवर अनेकांना कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

Bigg Boss 20 : कोण असेल बिग बॉस 20 च्या घरातील पहिलं कपल कोण? सलमान खानसमोर फुलली लव्हस्टोरी
अभिनेता सलमान खान
| Updated on: Sep 13, 2026 | 2:46 PM

Bigg Boss 20 : अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस 20’ तुफान चर्चेत आला. शोचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण आता तर एका स्पर्धकाना सलमान खान याच्यासमोर कनिका मान हिला प्रपोज केलं आहे. सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 20’ च्या पहिल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये घरातील वातावरणात प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहेत. शोचा होस्ट सलमान खान याने घरातील दोन लोकप्रिय स्पर्धक कनिका मान (Kanika Mann) आणि गुल्लू (कुशाल तंवर) यांच्यातील केमिस्ट्रीचे कौतुक केलं असून, हे दोघे या सीझनमधील ‘पहिले कपल’ बनू शकतात असे संकेत देखील दिले आहेत.

सोशल मीडियावर  एक शोचा एक प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये, सलमान खान याने गुल्लूला कनिकाला इंग्रजीत प्रपोज करण्याचं आव्हान दिलं. सलमान खान याने आव्हान दिल्यानंतर गुल्लूने कनिकाला प्रपोज देखील केलं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गुल्लूने विनोदी अंदाजात   “I found you pretty” (तू मला खूप आवडलीस) असं म्हणत कनिकाला प्रपोज केलं. एवढंच नाही तर गुल्लूने कनिका जिममध्ये कशी वर्कआउट करते याची नक्कल करून दाखवली, ज्यामुळे सलमान खानसह संपूर्ण घरातील सदस्यांमध्ये हशा पिकला.

 

 

यानंतर दोघांनी शोमध्ये एकत्र एक रोमँटिक डान्सही केला. सलमान खानने या जोडीचं कैतुक करत “तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसता,” अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, सोशल मीडियावर या दोघांचा प्रोमो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून प्रेक्षकांकडून त्याला पसंती मिळत आहे. चाहत्यांनी या जोडीसाठी #Gullanika  असा खास हॅशटॅगही तयार केला आहे. आता ही केमिस्ट्री शोमध्ये पुढे काय वळण घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बिग बॉसमध्ये रीती तिवारी हिच्या सोबतच ‘बिग बॉस 20’ मध्ये मेरी कॉम, माही विज, फैजल खान, काजी तौकीर, कुशाल तन्वर, आम्रपाली दुबे, कनिका मान, ईशा रिखी, खुशी दुबे, अमन गांधी, अर्शिफा खान, उदिति सिंह, शौविक चक्रवर्ती आणि गीता बसरा यांसारखे सेलिब्रिटी दिसणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us