AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kapil Sharma Show: कपिल शर्माने श्रीराम नेनेंवर केला विनोद, माधुरीची अशी रिअॅक्शन; व्हिडीओ तुम्ही पाहिला का ?

ज्यावेळी कपिलने संजय कपूरला विचारलं की, इतक्या वर्षांनतर तूम्ही दोघं एकत्र काम करीत आहात. ज्यावेळी सुरूवातीला डायरेक्टरचा संजय कपूरला फोन आला त्यावेळी काय वाटलं.

The Kapil Sharma Show: कपिल शर्माने श्रीराम नेनेंवर केला विनोद, माधुरीची अशी रिअॅक्शन; व्हिडीओ तुम्ही पाहिला का ?
कपिल शर्मा, माधुरी दिक्षित
| Updated on: Feb 18, 2022 | 10:46 AM
Share

मुंबई – कपिल शर्माच्या (kapil sharma) शोमध्ये आत्तापर्यंत अनेकांवरती विनोद केल्याचे आपण पाहतो. तिथं अनेक सेलिब्रिटी (celebrity) आत्तापर्यंत प्रमोशनच्या निमित्ताने गेले आहेत, तिथं गेल्यानंतर कपिल शर्माकडून त्यांना त्यांच्या करिअर आणि खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारतो. काहीवेळेला त्यांच्या खासगी आयुष्याला घेऊन अधिक चर्चा असते. नुकतीच माधुरी दिक्षीत(madhuri dixit), संजय कपूर (sanjay kapoor) हे दोघे कपिल शर्माच्या शो मध्ये गेले होते. तिथं गेल्यानंतर कपिलने दोघांचीही अधिक फिरकी घेतल्याचं समजतंय. दोघांची एक वेबसिरीज चाहत्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भेटीला येणार असल्याने दोघेही कपीलच्या शोमध्ये सहभागी झाले होते. तिथं कपिलने श्रीराम नेनेंवर एक विनोद केला त्यावर माधुरीने अशी रिअॅक्शन दिलं की, उपस्थितांचं तिने मन जिंकलं. तिचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.

काय केला विनोद 

कपिलने माधुरीकडे पाहत ‘आम आदमी के बस की बात नहीं है अपने दिल की धड़कन संभालना यही वजह है कि माधुरी मैम ने दिल के डॉक्टर से शादी करी है.’ असं म्हणटल्यानंतर माधुरी मोठ्याने हसू लागली आणि अशी रिअॅक्शन दिली उपस्थित असलेली लोक खूश झाली. सध्या हा माधुरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे चाहते त्या व्हिडीओवरती अधिक कमेंट करीत असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यानंतर माधुरीचं आणि श्रीराम नेने यांचं पहिलं बोलणं कसं झालं असेल त्यावर कपिल शर्मा याने पुन्हा विनोद केला त्यावर माधुरी लाजली असल्याचे देखील व्हिडीओत दिसत आहे.

संजय, माधुरी अनेक काळानंतर एकत्र

ज्यावेळी कपिलने संजय कपूरला विचारलं की, इतक्या वर्षांनतर तूम्ही दोघं एकत्र काम करीत आहात. ज्यावेळी सुरूवातीला डायरेक्टरचा संजय कपूरला फोन आला त्यावेळी काय वाटलं. त्याचं वाक्य पुर्ण व्हायच्या आत मी गाडीत बसलो होतो असं हास्यास्पद उत्तर संजय कपूर यांनी दिलं आहे. कारण संजय कपूर आणि माधुरी त्यांचा राजा नावाचा चित्रपट झाल्यानंतर त्या दोघांनी आत्तापर्यंत एकदाही एकत्र काम केलं नव्हतं. ज्यावेळी त्यांच्या सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला होता. त्यावेळी तो ट्रेलर लोकांच्या अधिक पसंतीला देखील पडला होता. त्यामुळे त्यांची वेबसिरीज नेमकी कशावरती आधारित असेल, तसेच त्यात काय दाखवलं जाणार आहे. याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे.

सलमान खानच्या बहिणीने खरेदी केलं 10 कोटींचं घर, तुम्हाला माहिती आहे का ? ते अलिशान घर कुठे आहे ?

अभिनेता नागार्जुन यांनी वडिलांना दिलेलं वचन केलं पुर्ण, 1080 एकर वनभूमी घेतली ताब्यात; काय होतं वचन ?

सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक, पॅनकार्डवर घेतलं कर्ज, सिबील स्कोर खराब

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.