Karan Johar : ‘हा माझा शेवटचा कॉफी कप, अन्…’, निरोपाची वेळ आली म्हणत करण जोहरची भावूक पोस्ट
Karan Johar : 'हा माझा शेवटचा कॉफी कप...', म्हणत बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्याने चाहत्यांना मोठी माहिती दिली आहे. करण जोहर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने आता निरोपाची वेळ आली आहे ... असं देखील म्हटलं आहे... सध्या सर्वत्र करण याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

Karan Johar : ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी कुशी कभी गम’ यांसारख्या एकापेक्षा एक सिनेमांचं दिग्दर्शन करत करण जोहर याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आणि अनेक नव्या सेलिब्रिटींसाठी बॉलिवूडचा दरवाजे उघडे करुन दिले. पण आता करण त्याच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. पोस्टमध्ये करण आता निरोपाची वेळ आहे… असं म्हटला आहे. तर जाणून घ्या नेकमं करण असं का म्हणाला. गेल्या काही दिवसांपासून ‘कॉफी विथ करण 9’ ची चर्चा रंगली आहे. ‘कॉफी विथ करण’चा शेवटचा एपिसोड कधी येणार याच प्रतिक्षेच चाहते आहे. तर 14 ऑक्टोबर पासून शो जियो हॉटस्टारवर सुरु होणार असून, हा ‘कॉफी विथ करण’चा शेवटचा एपिसोड असणार आहे…
करण जोहर याची घोषणा…
सांगायचं झालं तर, बुधवारी निर्मात्यांनी एक्स’ (X) हँडलवर ‘कॉफी विथ करण’च्या 9 व्या सीझनचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला. यात करण जोहर या शोच्या सुरुवातीचा प्रवास भावूक होऊन सांगताना दिसतो की, 2004 मध्ये म्हणजेच 22 वर्षांपूर्वी ‘पहिल्या कप’ने सुरू झालेला हा प्रसिद्ध चॅट शो भारताच्या सर्वात मोठ्या कलाकारांना एकत्र घेऊन आला आहे. 8 सीझन्स आणि 161भागांच्या माध्यमातून या शोने नातेसंबंध, प्रसिद्धी, महत्त्वाकांक्षा आणि सेलिब्रिटींच्या बदलत्या विश्वाची झलक सादर केली. काही पाहुणे मित्र म्हणून आले आणि कुटुंबाचाच एक भाग बनले; काहींना प्रेम मिळालं, तर काहीजण एक्स लव्हर बनले आणि काहींनी तर लग्नही केलं.
पुढे करण म्हणतो, ‘पण या संपूर्ण प्रवासामध्ये एकच गोष्ट आपली राहिली ती म्हणजे, आपले प्रेक्षक… ते आपल्यासोबत हसले, वाद झाले, आम्हाला ट्रोल देखील केलं आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे ते सतत आणखी एक कपसाठी परत आले. ‘कॉफी विथ करण’ला आजच्या या रूपात घडवणाऱ्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करत, हा अंतिम सीझन म्हणजे माझा त्यांच्यासाठी शेवटचा ‘कॉफी मग’ उंचावून निरोप घेण्याचा एक मार्ग आहे. तेव्हा, कॉफीच्या एका शेवटच्या कपासाठी माझ्यासोबत सामील व्हा. अगदी शेवटच्या वेळी.’, सध्या करण याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.