पार्टीतला ‘तो’ मोबाईल हरवला, एनसीबीला करण जोहरचं उत्तर

| Updated on: Dec 18, 2020 | 9:17 PM

चित्रपट निर्माता करण जोहरने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) नोटीसला उत्तर दिलं आहे (Karan Johar answer to NCB).

पार्टीतला तो मोबाईल हरवला, एनसीबीला करण जोहरचं उत्तर
Follow us on

मुंबई : चित्रपट निर्माता करण जोहरने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) नोटीसला उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर कलाकारांचा पार्टीतला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, हा व्हिडीओ ज्या मोबाईलने काढला होता तो व्हिडीओ हरवला आहे, अशी माहिती करण जोहरने एनसीबीला दिली आहे (Karan Johar answer to NCB).

करण जोहरने होस्ट केलेल्या एका पार्टीत कलाकारांनी ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोलाकडे (NCB) तक्रार केली होती. याप्रकरणी एनसीबीने सप्टेंबरमध्ये करण जोहरला नोटीस बजावली होती. या नोटीसला करण जोहरने शुक्रवारी (18 डिसेंबर) उत्तर दिलं (Karan Johar answer to NCB).

करण जोहरने होस्ट केलेल्या एका पार्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. याच पार्टीमधला एका व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता विक्की कौशल, शाहिद कपूर, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि वरुण धवनसह अनेक कलाकार दिसून आले होते.

या पार्टीमध्ये सर्व कलाकारांनी अमली पदार्थांचे सेवन केले असल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला होता. मनजिंदर सिंह सिरसा यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली होती. त्याचप्रमाणे त्यांनी एनसीबीचे अध्यक्ष राजेश अस्थाना यांची भेट देखील घेतली होती. अर्जुन रामपालची एनसीबीने 16 डिसेंबर रोजी चौकशी केली होती.

करण जोहरने या व्हिडीओसंदर्भात आधीच स्पष्टीकरण दिले आहे. करणचे म्हणणे आहे की, त्या पार्टीत कोणत्याही प्रकारचे ड्रग्स घेण्यात आले नव्हते. असे आरोप करून आमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या प्रकरणात आज करण जोहर एनसीबीला काय उत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष होतं. कारण ड्रग्ज प्रकरणात धर्मा प्रोडक्शन या प्रॉडक्शन कंपनीत काम करणारे दिग्दर्शक क्षितीज प्रसाद यांनाही अटक झाली होती. तथापि, तो जामिनावर बाहेर आहे.

संबंधित बातम्या : 

कमबॅकसाठी करण जोहरच्या पार्टीत जा, क्वान कर्मचाऱ्याची ऑफर, सुचित्रा कृष्णमूर्तीचा खळबळजनक दावा