Karan Johar : 25 वर्षांनंतर पू-रोहन पुन्हा एकत्र? करण जोहरच्या व्हिडिओने चाहत्यांची उत्सुकता वाढवली
करीना कपूरचा तो हटके अंदाज आणि ऋतिक रोशनचा देखणा लूक आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. आता तब्बल 25 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा चर्चेच आली आहे. दिग्दर्शक करण जौहरने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे

काय मग कभी खुशी कभी गम मधली पू आणि रोहनची जोडी आठवतेय ना? करीना कपूरचा तो हटके अंदाज आणि ऋतिक रोशनचा देखणा लूक आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. आता तब्बल 25 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा चर्चेच आली आहे. दिग्दर्शक करण जौहरने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून, दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उजाळा मिळाला असून,दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
करण जौहरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि ऋतिक रोशन यांची झलक पाहायला मिळते. करीना पुन्हा एकदा ‘पू’च्या अंदाजात दिसते आहे. व्हिडिओमध्ये ती लाल रंगाच्या सँडल्स उचलताताना आणि लिपस्टिक लावताना दिसते. हे दृश्य पाहून ‘कभी खुशी कभी गम’ मधील ‘पू’ ची एन्ट्री आठवल्याशिवाय राहत नाही. तर दुसरीकडे ऋतिक रोशन काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसतो. त्याच्या लूकमधून रोहनची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. याच व्हिडिओला ‘यू आर माय सोनिया’ या गाणे सुद्धा दिले आहे.
हा व्हिडिओ शेअर करत करणने, कुछ कहानिया 25 साल बाद भी खत्म नही होती.. असं कॅप्शन दिलं आहे.विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये 19 नोव्हेंबर 2026 ही तारीख दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या दिवशी या खास सरप्राईजमागचं नेमकं कारण समोर येणार आहे. पोस्टमध्ये Airbnb चा उल्लेख असल्यामुळे ही जोडी एखाद्या जाहिरात किंवा ब्रँड मोहिमेसाठी एकत्र येत असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
करणच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. काही यूजर्सनी ऋतिक आणि करीनाला पुन्हा एखाद्या चित्रपटात एकत्र पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काही चाहत्यांनी पू आणि रोहनची केमिस्ट्री कम्माल असल्याचं म्हटलं आहे.
कभी खूशी कभी गम हा चित्रपट 14 डिसेंबर 2001 रोजी प्रदर्शित झाला होता. करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरूख खान, काजोल, ऋतिक रोशन आणि करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ऋतिकने रोहन रायचंद, तर करीनाने पूजा शर्मा म्हणजेच पू ही व्यक्तिरेखा साकारली होती. चित्रपटातील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. आता 25 वर्षांनंतर पू आणि रोहन पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र ही भेट जाहिरातीपुरती असणार की त्यामागे आणखी काही मोठं सरप्राईज आहे, हे 19 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.