केदारनाथ चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

  • Sachin Patil
  • Published On - 23:32 PM, 27 Nov 2018

पुणे : केदारनाथला सिनेमाला हिंदूत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात आहे. हिंदू देव-देवतांचा अवमान केला जात आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी हिंदूत्वावादी संघटनांनी केली आहे.

या आधीही केदारनाथ येथील स्थानिकांनीही या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. तर आज पुण्यातील सनातन संस्था, हिंदू जनजागरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन करत चित्रपटाचा निषेध केला.

अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने या अगामी चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. मुख्य भूमिकेत सारा अली खान सोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत असणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसादही प्रेक्षकांकडून मिळत आहे.

चित्रपटातील गाण्यांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडल्याचे दिसत आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेली नमो नमो, स्वीटहार्ट आणि आता काफीराना हे नंव गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. येत्या 7 डिसेंबरला केदारनाथ चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केलं आहे.