5000 हून अधिक गाणी, 70 चित्रपट, प्रत्येक गाणं ठरतं हिट, या अभिनेत्याची नेटवर्थ पाहून बसेल धक्का
24,81,00,000 कोटींची संपत्ती, 5000 गाणी आणि 70 चित्रपटांमध्ये या अभिनेत्याने केलंय काम. त्याच्या प्रत्येक गाण्याची होते प्रचंड चर्चा. कोण आहे हा अभिनेता?

इंडस्ट्रीमधील काही कलाकार असे आहेत, जे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. अशातच आता भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार खेसारी लाल यादव हे नाव आज देशभरातील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय बनले आहे. दमदार अभिनय, वेगळी गायकी आणि प्रेक्षकांशी जोडून घेणारी शैली यामुळे त्याने भोजपुरी मनोरंजन विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत त्याने 5 हजारांहून अधिक गाणी गायली असून सुमारे 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्याला भोजपुरी इंडस्ट्रीतील ‘हिट मशीन’ म्हणूनही ओळखले जाते. अभिनय आणि गायनासोबतच त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि राजकारणातील वाटचालही अनेकदा चर्चेचा विषय ठरते.
खेसारी लाल यादवने आपल्या कारकिर्दीची सुरुवात गायनातून केली. 2008 मध्ये त्याचा ‘माल भेटाई मेला’ हा पहिला अल्बम प्रदर्शित झाला. या अल्बमला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्याला भोजपुरी संगीतविश्वात वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजामुळे तो अल्पावधीतच बिहारमधील लोकप्रिय गायक बनला.
अभिनयातही मिळवले यश
गायकीनंतर खेसारी लाल यादवने 2011-12 च्या सुमारास ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
यानंतर त्याने ‘संघर्ष’, ‘मेहंदी लगा के रखना’, ‘बलम जी लव्ह यू’, ‘लिट्टी चोखा’, ‘कुली नंबर 1’, ‘जिला चंपारण’ यांसारख्या अनेक गाजलेल्या भोजपुरी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. आतापर्यंत त्याने सुमारे 70 चित्रपटांमध्ये काम केले असून भोजपुरी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते.
किती आहे संपत्ती?
खेसारी लाल यादवने अभिनय, गायन, स्टेज शो आणि इतर माध्यमांतून मोठी आर्थिक प्रगती केली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्याची एकूण मालमत्ता सुमारे 24.81 कोटी रुपये आहे. भोजपुरी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये त्याची गणना केली जाते.
भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपल्या मेहनत, संघर्ष आणि प्रतिभेच्या जोरावर खेसारी लाल यादवने मोठे यश संपादन केले आहे. गायनापासून अभिनयापर्यंत आणि मनोरंजनापासून राजकारणापर्यंत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून आजही तो भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो.