Koffee With Karan : ‘कॉफी विथ करण’मध्ये रंगणार पंजाबी तडका? दिलजीत-विकीच्या जोडीची जोरदार चर्चा

Koffee With Karan 9 : करण जोहरचा बहुचर्चित, लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण' चा शेवटचा आणि 9वा सीझन सुरू झाला आहे. पहिला एपिसोड लोकांना खूपच आवडला. आता दिलजीत दोसांज आणि विकी कौशल या शोमध्ये दिसणार का ?

Koffee With Karan : ‘कॉफी विथ करण’मध्ये रंगणार पंजाबी तडका? दिलजीत-विकीच्या जोडीची जोरदार चर्चा
| Updated on: Oct 17, 2026 | 3:49 PM

Koffee With Karan 9: करण जोहरचा अतिशय लोकप्रिय चॅट शो असलेल्या ‘कॉफी विथ करण’चा 9 वा सीझन अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. विशेष म्हणजे हाच अखेरचा सीझन असून त्यानंतर हा शो बंद होणार आहे. या सीझनच्या पहिल्या भागातच दबंग स्टार सलमान खान शोमध्ये आला. त्याने त्याचे जुने चित्रपट आणि आयुष्याशी निगडीत अनेक मजेदार किस्से शेअर केले. या एपिसोडमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री करिश्मा कपूरही दिसली. दोघांची शानदार
केमिस्ट्री लोकांना खूपच आवडली. सलमान खानचा हा पहिला एपिसोड सोशल मीडियावर प्रचंड ट्रेडिंग आहे. याच दरम्यान आता ‘कॉफी विथ करण’बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. असं म्हटलं जातंय की या ओशच्या आगामी एपिसोडमध्ये दिलजीत दोसांज आणि विकी कौशल एकत्र करणच्या काऊचवर दिसू शकतात.

सलमान आणि करिश्माच्या धमाकेदार एपिसोडनंतर या शोबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच फिल्मफेअरमध्ये एक रिपोर्ट आलाय, त्यानुसार, ‘कॉफी विथ करण’च्या काऊचवर आता पंजाबी अंदाज पहायला मिळऊ शकतो. करणच्या शोमध्ये गायक दिलजीत दोसांज आणि अभिनेता विकी कौशल एकत्र दिसू शकतील, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Loading...

दोन पंजाबी तरूणांचा दिसणार जबरदस्त स्वॅग!

खरं तर, दिलजीत दोसांझ आणि विकी कौशल हे दोघेही आपल्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंग, बेधडक अंदाज आणि जबरदस्त आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात. याआधीही जेव्हा-जेव्हा हे दोघे एकत्र दिसले, तेव्हा चाहत्यांना त्यांची स्टाईल खूप आवडली होती. त्यामुळेच ‘कॉफी विथ करण’च्या नव्या सीझनमध्ये हे दोन्ही स्टार्स एकत्र बसून करण जोहरच्या प्रश्नांना सामोरे जाणार असतील, तर हास्याचा दुहेरी धमाका पाहायला मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पडद्यामागील मजेशीर किस्स्यांपासून ते करिअरमधील महत्त्वाच्या निर्णयांपर्यंत, या दोघांच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहतेही प्रचंड उत्सुक आहेत. “दिलजीत आणि विकी यांच्यात खूप चांगलं बॉन्डिंग आहे आणि हा एपिसोड या सीझनमधील सर्वोत्तम एपिसोड्सपैकी एक मानला जात आहे” असं याच रिपोर्टमधून समोर आलं आहे.

मात्र, या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असले, तरी या एपिसोडबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. जर हा एपिसोड प्रत्यक्षात आला, तर संगीत आणि चित्रपटसृष्टीशी जोडलेल्या या दोन कलाकारांना एकाच मंचावर पाहण्याची संधी चाहत्यांना मिळू शकते. दोघांचाही प्रवास रंजक असल्याने त्यांच्या गप्पा आणि किस्सेही मनोरंजक ठरण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us