AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kranti Redkar : स्वतःला त्रास करून घेणं किंवा त्याला ड्रममध्ये भरणं, यापेक्षा…घटस्फोट आणि लग्नाबद्दल स्पष्टच बोलली क्रांती रेडकर

Kranti Redkar On Marriage And Divorce : क्रांती रेडकरनं नुकत्याच एका मुलाखतीत घटस्फोट आणि लग्नाबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे.

Kranti Redkar : स्वतःला त्रास करून घेणं किंवा त्याला ड्रममध्ये भरणं, यापेक्षा...घटस्फोट आणि लग्नाबद्दल स्पष्टच बोलली क्रांती रेडकर
| Updated on: Oct 24, 2026 | 9:24 AM
Share

आजकाल घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलं आहे. अनेक कलाकार लग्नाबद्दल आणि घटस्फोटावर मोकळेपणानं भाष्य करतात. अशातच आता मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरनंही घटस्फोटाबद्दल आणि लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्रीनं गाजलेल्या मुस्कान प्रकरणाचाही उल्लेख केला आहे.

क्रांती रेडकरचं वक्तव्य चर्चेत

क्रांती रेडकर म्हणाली की, ‘जेव्हा दोन व्यक्तींचा घटस्फोट होतो, तेव्हा दोघांपैकी कोण किती वाईट हे गजरेचं नसतं. त्यांचं त्या लग्नात पटत नाही, म्हणून ते वेगळे होतात. कदाचित तिचं एका वेगळ्या माणसाशी पटेल, ह्याचं वेगळ्या व्यक्तीसोबत पटेल. त्यामुळे, मला नेहमी असं वाटतं जेव्हा तुमचा घटस्फोट होतो, तेव्हा त्यात काहीही वाईट नाही, काहीही वावगं नाही. तुमचं त्या व्यक्तीसोबत नाही जमत आहे, एकमेकांना तर समजून घ्या, प्रयत्न करा. मला नेहमी वाटतं, लग्न हे 100% प्रयत्नांवर अवलंबून असतं. तुम्ही खूप प्रयत्न करूनही, जेव्हा असं वाटतं मी आता जगूच शकत नाही, तेव्हा बाहेर पडायचा निर्णय घ्या.’

‘स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा किंवा त्याचा खून करून ड्रममध्ये भरणं, त्यापेक्षा वेगळं होणं सोपं आहे. तुम्हालाही एक चांगला जोडीदार मिळेल, त्यालाही मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं, लग्न करताना 70 गुण जुळतात की नाही ते बघावं. कारण, उरलेले 30 कधीच जुळणार नाहीत. लग्न म्हणजे प्रेम, जुळवाजुळव आणि तडजोड यावर अवलंबून असतं.’ असंही क्रांती शेवटी म्हणाली. ‘आरपार‘ला दिलेल्या मुलाखतीत क्रांती रेडकर बोलत होती.

दरम्यान, क्रांती रेडकर सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देते. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर तिनं 2017 मध्ये समीर वानखेडे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली असून तिला दोन मुली आहेत. क्रांतीच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘काकण‘, ‘जत्रा‘, ‘खो–खो‘, शिक्षणाच्या आईचा घो‘ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…