कृती सेनना मुंबईला यायचं होतं, विमान अहमदाबादला घेऊन गेलं

बईतील पावसामुळे अनेक विमानं वळवण्यात आली आहेत, तर काही उड्डाणंही रद्द करण्याची वेळ आली. याचाच फटका अभिनेत्री कृती सेननला बसला. एका मासिकाच्या फोटोशूटसाठी दिल्लीला गेलेल्या कृतीला मुंबईला परत यायचं होतं, पण तिचं विमान खराब हवामानात अडकलं आणि मुंबईला येणारं विमान अहमदाबादला वळवावं लागलं.

कृती सेनना मुंबईला यायचं होतं, विमान अहमदाबादला घेऊन गेलं

मुंबई : पावसाने मुंबईत धुमाकूळ घातलाय, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, ज्यातून सेलिब्रिटीही सुटले नाहीत. मुंबईतील पावसामुळे अनेक विमानं वळवण्यात आली आहेत, तर काही उड्डाणंही रद्द करण्याची वेळ आली. याचाच फटका अभिनेत्री कृती सेननला बसला. एका मासिकाच्या फोटोशूटसाठी दिल्लीला गेलेल्या कृतीला मुंबईला परत यायचं होतं, पण तिचं विमान खराब हवामानात अडकलं आणि मुंबईला येणारं विमान अहमदाबादला वळवावं लागलं.

 

पहाटे चार वाजताच हे विमान खराब हवामानात अडकलं, ज्यामुळे प्रवाशांचीही चिंता वाढली. त्यामुळे कृती सेननसह इतर प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादला वळवण्यात आलं. भल्या पहाटे हा मनस्ताप सहन केलेल्या कृती सेननच्या डोक्याला आणखी एक ताप झाला. अहमदाबाद विमानतळावर उतरताच तिला सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी घेरलं.

 

कृती सेननसाठी विमान कंपनीने हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली, मात्र ती तिथेच अडकली. कारण, तिला मुंबईहून जांबियाला एका कार्यक्रमासाठी जायचं होतं. दक्षिण आफ्रिकेत असलेल्या या देशात पोहोचणं कृती सेननसाठी आता अशक्य दिसत आहे. कारण, मुंबईमध्ये वातावरण खराब असल्याने अनेक विमानांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

कृती सेननने नुकतंच पानीपत या सिनेमाचं शूटिंग शेड्यूल पूर्ण केलंय. हे शूट पूर्ण केल्यानंतर कृतीने सोशल मीडियाद्वारे आशुतोष गोवारीकर यांचा एक फोटो शेअर केला होता. आपल्याला संधी दिल्याबद्दल तिने गोवारीकर यांचे आभार मानले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *