‘या’ प्रसिद्ध कलाकाराची ‘तारक मेहता’ शोमधून एक्झिट, अश्रूपूर्ण नयनांनी निरोप घेत म्हणाला…

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मालिकेतून अनेक कलाकार बाहेर पडत असतानाच आता एका प्रसिद्ध कलाकारानेदेखील मालिकेतून निरोप घेतला आहे.

या प्रसिद्ध कलाकाराची तारक मेहता शोमधून एक्झिट, अश्रूपूर्ण नयनांनी निरोप घेत म्हणाला...
| Updated on: Jul 27, 2024 | 12:27 PM

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे. कॉमेडी बेस्ड या मालिकेचे सर्व वयोगटातील चाहते आहेत. येत्या 28 जुलै रोजी ही मालिका 16 वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र त्यापूर्वीच चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. निर्मात्यांनी शुक्रवारी, 26 जुलै रोजी एक व्हि़डीओ जारी केला आहे. त्यात अशी माहिती देण्यात आली की आता एका प्रसिद्ध अभिनेत्याने शो सोडला आहे. विशष म्हणजे त्या अभिनेत्याने स्वत: व्हिडिओमध्ये त्याचा संपूर्ण प्रवास दाखवला आणि आपण शो सोडत असल्याचे त्यानेच सांगितले. त्याने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील कुटुंबासोबत केकही कापला.

गोली ने सोडला ‘तारक मेहता’ शो

या मालिकेत ‘गोली’ ही भूमिका निभावणारा अभिनेता कुश शाह याने या मालिकेतून निरोप घेतला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या यूट्यूब चॅनलवर कुशचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये कुश याचा शोच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. कुशने त्याच्या प्रेक्षकांचे आभारही मानले. प्रेक्षकांनी आणि गोकुळधाम सोसायटीने भरभरून प्रेम दिल्याचे त्याने नमूद केले.

प्रेक्षकांनी दिल भरभरून प्रेम

‘आमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार, मी गोली (गुलाब कुमार) तुम्हाला मनापासून सलाम करतो. ही शो सुरू झाल्यावर आपण पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मी खूप लहान होतो. तेव्हापासून मला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळील. या गोकुळधाम परिवारानेही मला तेवढच प्रेम दिलं. माझ्या इथे खूप चांगल्या आठवणी आहेत. मी खूप मजा केली. ‘

‘माझं बालपण येथेच गेले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हे (मालिकेचे) झाड मोठं झालं तेव्हा मीही इथेच मोठा झालो ‘ अशा आठवणी त्याने सांगितल्या. त्यानंतर कुशने शोचे निर्माते असित कुमार मोदी यांचे आभार मानले.  त्यानंतर कुशने मालिकेच्या संपूर्ण टीमसह केक कापून सेलिब्रेशन केले. त्याने असित कुमार मोदी यांनाही केक भरवला. त्यावेळी असित यांनी कुशचे भरभरून कौतुक केले.

 

इमोशनल झाला कुश

शोमधून बाहेर पडताना कुश शाह खूमप भावूक झाला. ‘मी या शोमध्ये 16 वर्षे पूर्ण केली आहेत आणि या 16 वर्षांचा प्रवास खूप सुंदर होता. तुझ्या प्रेमामुळेच ती सुंदर झाली आहे. त्यामुळे तुमचे प्रेम लक्षात घेऊन मी निरोप घेतो, असे कुश म्हणाला.