भाऊ कदमांनी तो एक प्रश्न विचारताच भडकले राहुल देशपांडे, कुशल बद्रिकेने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरील किस्सा सांगितला..
Kushal Badrike On Rahul Deshpande : चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. या कार्यक्रमातील किस्से आणि जोक आजही आठवतात. यादरम्यानच राहुल देशपांडे चला हवा येऊ द्यामध्ये पाहुणे म्हणून दाखल झाल्यानंतर नक्की काय घडले हे कुशल बद्रिकेने सांगितले.

‘चला हवा येऊ द्या’ पूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा कार्यक्रम होता. भाऊ कदमांचे विनोद म्हणजे सांगता सोय नाही. या कार्यक्रमात अनेक पाहुणे मंडळी येतात, त्यांच्यासोबतही विनोद केली जातात आणि प्रश्न विचारले जातात. 10 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर 2024 मध्ये या कार्यक्रमाने निरोप घेतला. मात्र, आजही या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. चला हवा येऊ द्या कार्यक्रमात अभिनेता कुशल बद्रिकेनेही काम केले. यादरम्यान कुशल बद्रिकेने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत चला हवा येऊ द्या कार्यक्रमामध्ये गायक राहुल देशपांडे पाहुणे म्हणून दाखल झाल्यानंतर नक्की काय घडले आणि राहुल देशपांडे एका प्रश्नावर कसे चिडले होते हे त्यांनी सांगितले.
कुशल बद्रिकेने संगितले की, चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे दाखल झाले होते. यादरम्यान भाऊ कदम यांनी संगिताशी संबंधित प्रश्न राहुल देशपांडे यांना विचारला होता. मात्र, हा प्रश्न राहुल देशपांडे यांना अजिबात आवडला नाही. त्यांना भाऊ कदम यांनी विचारलेला प्रश्न खटकला. आम्ही प्रेक्षकांमध्ये जाऊन पाहुण्यांना प्रश्न विचारत होतो.
ती एक नवीन विनोदाची पद्धत सुरू केली होती. राहुल देशपांडेंना प्रश्न विचारण्यासाठी भाऊ कदम एका प्रेक्षकाच्या शेजारी बसले. त्यांनी म्हटले की, राहुल सर तुम्ही जे गाणे गाता ते कोणत्या ना कोणत्या रागात गाता.. यावर राहुल देशपांडे यांनी हो उत्तर दिले. भाऊ कदम यांनी पुढे म्हटले, एवढा कसला राग येतो पण तुम्हाला? रागात कशाला गायचे ना गाणे… भाऊ कदम यांच्या प्रश्नाचा राग राहुल देशपांडे यांना आला.
त्यांच्या चेहऱ्याचा रंग उतरला. राहुल देशपांडे यांच्या चेहऱ्यावर राग दिसला. आम्ही गमंत म्हणून बोलत होतो, पण त्यांना कसला अपमान वगैरे काय वाटले हे कळू शकले नाही. ते गंभीर झाले. त्यानंतर सेटवर सर्व शांतता पसरली. मला काय झाले माहिती नाही पण मी लगेचच म्हणालो की, सर आता माझी सटकली मला राग येतोय.. हे गाणे कोणत्या रागात गायले. यावर मग राहुल देशपांडे हसले आणि माले की, अरे तुम्ही धन्य आहात रे… असे म्हणून ते हसले आणि त्यानंतर पुन्हा एकदा वातावरण चांगले झाले.