Bhagyashree Mote: ‘तुझ्या सोबत आयुष्य खूप सुंदर आहे’, म्हणत अभिनेत्री भाग्यश्री मोटेने बॉयफ्रेंडला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

भाग्यश्री वजन वाढीच्या समस्येने ग्रस्त आहे. यामुळे अनेकदा दिला सोशल ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. एवढंच नव्हेतर या समस्येबाबत तिने स्वतंत्र पोस्ट लिहित आपल्या चाहत्यांना माहितीही दिली होती.

Bhagyashree Mote:  तुझ्या सोबत आयुष्य खूप सुंदर आहे, म्हणत अभिनेत्री भाग्यश्री मोटेने बॉयफ्रेंडला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
bhagyashree Mote , vijay palande
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 11, 2022 | 12:42 PM

मराठी टेलिव्हजन व चित्रपटसृष्टीत अभिनेत्री भाग्यश्री मोटेने (Bhagyashree Mote)आपल्या अभिनयाने स्वतः असे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री(Actress)  भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सक्रिय असलेली दिसून येते. सोशल मीडियावर तिचा स्वतंत्र असा चाहता वर्ग आहे. स्वतः विषयीच्या अनेक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर बॉयफ्रेंड विजयच्या वाढदिवसानिमित्त एका खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. भाग्यश्रीचा बॉयफ्रेंड विजय पलांडे (Vijay Palande)मेकअप आर्टिस्ट आहे. त्याच्या सोबतचे फोटोही ती सातत्याने शेअर करत.

इंस्टाग्राम वर केलेल्या पोस्टमध्ये भाग्यश्रीने म्हटले आहे कि, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव्ह , तू माझं मोठं संरक्षणकवच आहे व मला मिळालेला मोठा आशीर्वाद आहे. तूला माझ्या आयुष्यात पाठवून दिल्याबद्दल देवाची मी मनापासून आभार मानते. मी आपल्या दोघांच्या बद्दल खूप लिहू शकते.  पण कितीही लिहिले तरी ते पुरेसे नसणार आहे. विजयला निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा असे तिने आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

बॉडी शेमिंगवरून करण्यात आले होते ट्रोल

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भाग्यश्रीला इंस्टाग्रामवर बॉडी शेमिंगवरून ट्रोल करण्यात आले होते. त्यावरून तिने नेटकऱ्यांना चांगलेच खडसावले होते. भाग्यश्री वजन वाढीच्या समस्येने ग्रस्त आहे. यामुळे अनेकदा दिला सोशल ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. एवढंच नव्हेतर या समस्येबाबत तिने स्वतंत्र पोस्ट लिहित आपल्या चाहत्यांना माहितीही दिली होती. व्यवसायिक पातळीवर बोलायचे झाल्यास भाग्यश्री ‘काय रे रास्कला’ या चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर तिने पाटील, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ , ‘विठ्ठल’ या सिनेमातही दिसून आली होती. त्याबरोबरच ‘देवो के देव महादेव’ , ‘देवयानी’  या मालिकांमध्ये दिसून आली होती.