AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde यांची कॅबिनेटला दांडी, राज्याच्या होमग्राऊंडवर भाजपच्या त्या खेळीने नाराजी? उदय सामंतांनी दिली मोठी कबुली

Eknath Shinde Displeased again: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा समोर येत आहे. महापालिकेच्या घडामोडी त्यासाठी कारणीभूत असल्याचे समजते. भाजपने राज्याच्या होमग्राऊंडवर अशी काही खेळी खेळली की महाविकास आघाडीच नाही मित्रपक्षांनाही झटका बसला. त्याचेच पडसाद सध्या राजकारणात उमटत असल्याची चर्चा होत आहे.

Eknath Shinde यांची कॅबिनेटला दांडी, राज्याच्या होमग्राऊंडवर भाजपच्या त्या खेळीने नाराजी? उदय सामंतांनी दिली मोठी कबुली
एकनाथ शिंदे यांची कॅबिनेटकडे पाठ
| Updated on: Dec 31, 2025 | 1:32 PM
Share

Eknath Shinde-Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. वर्षाच्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्याने या चर्चांना अधिक हवा मिळाली. शिंदे नाराज असल्याचे प्रकर्षाने जाणवले. वर्षाच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार नाहीत अशी माहिती समोर येत होती. तब्येत ठीक नसल्याने ते ठाण्यात घरीच आराम करतील अशी माहिती समोर येत होती. आज अखेर एकनाथ शिंदे हे कॅबिनेट बैठकीला हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू आहे.

या कारणामुळे नाराजी

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर भाजपने महापालिकेच्या निवडणुकीच तयारी सुरु केली. पण कुणाच्याच ताकास तुरी लागू दिली नाही. जागा वाटपापासून ते महायुतीपर्यंत अनेक ठिकाणी केवळ बैठकांचे जोर सत्र सुरु ठेवले. भाजपने पत्ते काही उघड केले नाही. काही ठिकाणी कमी जागा, तर प्रस्थापित जागांवर भाजपचा दावा यामुळे शिंदेसेना अनेक ठिकाणी नाराज होती. पण अखेरच्या काही तासात भाजपसोबत वाजल्याने राज्यातील २९ पैकी ११ ठिकाणीच महायुती होऊ शकली. इतर १८ ठिकाणी केवळ बैठका, चर्चा आणि तोंडाच्या वाफातच क्रयशक्ती वाया गेली. भाजपने अनेक ठिकाणी झुलवत ठेवल्याचा आरोप शिंदे सेनेच्या नेत्यांनी केला. या सर्व घाडामोडींमुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

तब्येतीचे कारण पुढे

मी पहिले खुलासा करतो कॅबिनेटला एकनाथ शिंदे साहेब तब्येत आणि वैयक्तिक कारणास्तव उपस्थित नव्हते, अशी पहिली प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली. रवींद्र धंगेकर हे पक्षाची भूमिका मांडणारी व्यक्ती नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. ते आमचे महानगरप्रमुख आहेत.धंगेकर आणि निलमताई गोऱ्हे यांच्याशी चर्चा केली आहे. पुण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार मला देखील नाही.शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे भूमिका स्पष्ट करतील.मुंबईत १३७ आणि ९० जागा आम्ही लढतोय आणि आरपीआयला देखील जागा सोडलेल्या आहेत

कृपाशंकर सिंग महायुतीचं धोरण ठरवत नाहीत

कृपाशंकर महायुतीचं धोरण ठरवत नाही. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री धोरण ठरवतील असे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. तिकडे काय चाललं आहे? हे देखील बघितलं पाहिजे. मनसेला फक्त ४५-५० जागा मिळाल्या आहेत. तिकडे, मविआच्या पक्षातील कार्यालये फोडली आहेत. मराठी माणसावरुन राजकारण करणाऱ्यांना मराठी जागा कुठेही मिळाल्या नाही. तिथे पण ठाकरे गटच लढतं आहे. आमच्याकडे कुठेही बंडखोरी झालेली नाही.युती कुठेही तुटलेली नाही. युती झाली तिथलं देखील बोललं पाहिजे.मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली वसई विरार इथे युती झाली आहे, याबद्दल देखील तुम्ही बोललं पाहिजे ना, असे सामंत म्हणाले.

मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल.
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने.
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर.
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन..
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन...
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.