BJP: अंगावर पेट्रोल ओतलं, तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांने फोडला हंबरडा, छत्रपती संभाजीनगरमध्ये हायहोल्टेड ड्रामा
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election: छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत. दोन महिला उमेदवारांनी अन्नत्याग केला आहे. तर एका उमेदवाराने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्याने हंबरडा फोडला.शहर भाजप कार्यालयासमोरील हायहोल्टेज ड्रामा काही केल्या संपलेला नाही.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election: छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत. दोन महिला उमेदवारांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. तर दुसरीकडे एका उमेदवाराने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. कालपासून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या रागाला आणि भावनांना पारावर उरलेला नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीत डावलल्याने त्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. प्रशांत भदाणे पाटील यांनी आज मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर मोठा राडा केला. इतरही अनेक उमेदवारांनी तिकीट नाकारल्याने सकाळापासूनच मंत्री अतूल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्यावर असंतोष व्यक्त केला. त्यामुळे या बंडोबांना शांत करण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर उभे ठाकले आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळल्याचे सांगण्यात येत आहे. यासर्व प्रकारामुळे भाजपच्या तिकीट वाटपावरच प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. उपऱ्यांना स्थान दिल्याचा हा राग असल्याचे निष्ठावंतांचे समर्थकांचे म्हणणे आहे. गेल्या इतक्या वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांना आता तिकीट वाटपात बाहेरचा रस्ता दाखवल्या जात असल्याचा आरोप पक्ष नेतृत्वावर करण्यात येत आहे.
कराड-सावेंच्या कारच्या काचेवर आदळ आपट
भाजपातील इच्छुक नाराज कार्यकर्त्यांचा खासदार भागवत कराड व मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला. आज ही नाराजांचा संताप दिसून आला. भागवत कराड व अतुल सावे यांच्या गाडीवर हाताने आदळ आपट करण्यात आली. दोन्ही नेत्यांनी साधी विचारपूसही केली नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. यावेळी निदान त्यांनी कारमधून उचलून समजूत घालावी अशी अपेक्षा या कार्यकर्त्यांना होती. पण तसे न झाल्याने या कार्यकर्त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला.
यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवरले. मंत्री अतुल भागवत कराड यांच्या गाड्या सुखरूप काढून दिल्या. प्रभाग क्रमांक दोन मधून प्रशांत भदाणे यांना नाकारल्याने समर्थक आक्रमक झाले. प्रशांत भदाणे यांच्या समर्थकांनी भाजप प्रचार कार्यालयात मोठा राडा केला. प्रशांत भदाणे समर्थकात भागवत कराड यांच्या बद्दल प्रचंड नाराजी दिसून आली. अतुल सावे व भागवत कराड यांच्यावर तिकीट नाकारल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे दोन महिला कार्यकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.
तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल
तर या सर्व राड्यावर भाजपच्या नेत्यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. महिलांच्या अन्नत्याग आंदोलनावर त्यांनी मत व्यक्त केलं आहे. पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी उमेदवारी इच्छा होती मागणं हट्ट करणं, मात्र ज्या पद्धतीने त्या हट्ट करतात ते भाजपात अजिबात अभिप्रेत नाही.हे पक्ष कधी खपवून घेणार नाही, असं बॉण्डवर लिहून पाहिजे असा शब्द भाजपात कोणीही कुणाला देत नसतं.कुठलेही आश्वासन देऊन कार्यकर्ते सांभाळणे ही भाजपाची पद्धत नाही.योग्य वेळी संधी दिली जाते पण मलाच मिळाल पाहिजे मी म्हणेल ते पक्षांना ऐकलं पाहिजे असं होत नाही.पक्षाचा शिस्तभंग होते यांच्यावर निश्चित कारवाई होईल, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिला.
