AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026: २ हजार ५१६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, मुंबई महापालिकेचा गड कोण सर करणार?

Mumbai Municipal Corporation Election 2026 : मुंबईत चौरंगी लढत होणार हे स्पष्ट आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक चुरस आहे. मनसे-उद्धव सेना आणि शिंदे-भाजप सेनेत खरी लढत आहे. तर काँग्रेसही मोठे आव्हान उभे करेल असे चित्र दिसत आहेत. या निवडणुकीच्या फडात २ हजार ५१६ उमेदवार नशीब आजमावत आहेत.

BMC Election 2026: २ हजार ५१६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, मुंबई महापालिकेचा गड कोण सर करणार?
मुंबई महानगरपालिका निवडणूक
| Updated on: Dec 31, 2025 | 11:40 AM
Share

BMC Election 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचा गड कोण सर करणार याचीच सर्वाधिक उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. ही निवडणूक चौरंगी होण्याची दाट शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये चुरस दिसून येत आहे. मनसे-उद्धव सेना आणि भाजप-शिंदे सेना यांच्यातील कलगीतुरा आता रंगायला सुरुवात होईल. दोन्ही बाजूने प्रचाराच्या तोफा धडाडतील तेव्हा निखारे बाहेर पडतील. काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरपर्यंत राज्यात मोठा गोंधळ दिसून आला. अनेकांची तिकीट कापल्या गेल्याने मोठा राडा झाला. पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप करण्यात आले. मुंबईत एकूण २ हजार ५१६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता महापालिकेचा गड कोण सर करणार हे १६ जानेवारी २०२६ रोजी समोर येईल.

२ हजार ५१६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई महापालिकेसाठी एकूण २ हजार ५१६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरचा दिवस होता. त्यामुळे या चुरशीत कोण बाजी मारणार हे लवकरच समोर येईल.  महापालिकेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी एकूण ११ हजार ३९१ अर्ज वितरित करण्यात आले होते.सर्वाधिक उमेदवारी अर्ज एम पूर्व विभागात वितरीत झाले. या ठिकाणी १८२ इतके सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत. तर सर्वात कमी अर्ज मध्य विभागातून वितरीत झाले. या भागात ५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहे.आज नामनिर्देशन पत्र भरलेल्या उमेदवारांची छाननी होणार आहे. त्यात कुणाचा अर्ज बाद होतो, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. तर बंडखोरी रोखण्यासाठी कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो याचीही चाचपणी आणि चर्चा सुरू आहे.

अमरावती महापालिकेत  १०२१ उमेदवार

अमरावती महापालिका मध्ये ८७ नगरसेवक निवडीसाठी १०२१ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काल अखेरच्या दिवशी 715 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अमरावती महापालिका निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल ७१५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत १०२१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. २२ प्रभागांत ८७ सदस्य निवडीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी मतमोजणी होणार आहे.

अमरावती महापालिका प्रशासनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात ठिकाणी व्यवस्था केली होती. 2017 मध्ये भाजपमधून 45 नगरसेवक विजयी झाले होते. काँग्रेसचे मागील वेळी 15 नगरसेवक विजयी झाले होते.. त्यापैकी पाच नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले. काँग्रेसने यंदा 65 नवीन चेहऱ्यांन्या उमेदवारी दिली आहे.

ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर.
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन..
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन...
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...