Begum Fights End: संघर्ष, सत्ता आणि वारसा! दोन बेगममधील लढाई संपली, एकीने सोडले जग तर दुसरीला सोडवा लागला बांगलादेश
Begum Khaleda Jiya And Sheikh Hasina Conflict: बांगलादेशातील एका मोठ्या इतिहासावर एका बाजूने पडदा पडला. अजून दुसरी बाजू जिवंत आहे. दोन बेगममधील लढाई मात्र संपली आहे. संघर्ष, सत्ता आणि वारसा घेऊन मोठ्या तडफेनं या दोन्ही बेगम राजकारणात उतरलेल्या होत्या. आयुष्यात त्यांनी अनेक चढउतार, बलिदान आणि मान-अपमान सहन केले. त्यातील एक जग सोडून गेली तर दुसरी देश सोडून...

Bangladesh Two Begum Fights: बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची (BNP) नेता बेगम खालिदा जिया यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर एका राजकीय लढाईचा अध्याय संपला. खालिदा जिया या बांगलादेशाची स्थापना झाल्यानंतर लागलीच राजकारणात सक्रिय झाल्या होत्या. त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांनी तीन-तीनवेळा सत्ता हाती घेतली होती. या दोघींना संघर्ष कधी सुटला नाही. त्यांच्यामागे भक्कम राजकीय वारसा होता. अनेक बलिदान, मान-अपमान आणि सत्तेसाठी संघर्ष करण्यात दोघींचे आयुष्य तावून सुलाखून निघाले. खालिदा जिया यांच्या निधानाने दोन बेगममधील लढाई अखेर संपली. खालिदा जिया आणि शेख हसीना यांच्यातील सत्ता संघर्षाची लढाई गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. आता एक जग सोडून गेली तर दुसऱ्या बेगमला देश सोडावा लागला आहे. ...
