Madhurani Prabhulkar : माधुरी दीक्षितच्या प्रेमात होते मधुराणी प्रभुलकरचे वडील, ‘धक-धक गर्ल’चं लग्न होताच…अभिनेत्रीनं सांगितला किस्सा

Madhurani Prabhulkar : मधुराणी प्रभुलकरनं 'कोण होणार करोडपती' मध्ये तिच्या वडिलांचा किस्सा सांगितला आहे.

Madhurani Prabhulkar : माधुरी दीक्षितच्या प्रेमात होते मधुराणी प्रभुलकरचे वडील, धक-धक गर्लचं लग्न होताच...अभिनेत्रीनं सांगितला किस्सा
| Updated on: Oct 26, 2026 | 6:39 PM

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे चाहते केवळ सर्वसामान्यांमध्येच नाहीत, तर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांमध्येही आहेत. अभिनेत्री मधुराणी गोखलेचे वडीलदेखील माधुरी दीक्षितचे मोठे चाहते होते. मात्र, माधुरीनं लग्न केल्यानंतर त्यांच्या मनाला चांगलाच धक्का बसला होता. मधुराणीनं नुकत्याच एका कार्यक्रमात हा मजेशीर किस्सा सांगितला.

माधुरीच्या लग्नामुळे वडिलांचा झाला होता प्रेमभंग!

Loading...

अभिनेत्री मधुराणी गोखलेनं ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. तिच्या अभिनयाचं आजही कौतुक होतं. नुकत्याच ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही रंजक आठवणी सांगितल्या. मधुराणीचे वडील माधुरी दीक्षितचे चाहते होते. माधुरीच्या अभिनयावर आणि सौंदर्यावर ते भाळले होते. मात्र, माधुरीनं लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांची प्रतिक्रिया ऐकून उपस्थितांना हसू आवरता आलं नाही.

मधुराणीनं सांगितलं की, माझे बाबा तुमचे खूप मोठे फॅन होते. तुम्ही अचानक लग्न केलं. त्यानंतर ते कितीतरी दिवस म्हणायचे, ‘माझ्या माधुरीने लग्न केलं यार.’ पण पुढे ते एकच सांगायचे की, तिनं श्रीराम नावाच्या माणसाशी लग्न केलं कारण त्यांचं नाव श्रीराम होतं.’, असं मधुराणीनं सांगताना माधुरीही लाजून हसली.

अभिनय क्षेत्रात येण्यासाठी वडिलांचा होता विरोध

मधुराणी गोखलेला लहानपणापासून अभिनय क्षेत्राची आवड होती. मात्र, तिनं या क्षेत्रात करिअर करावं, यासाठी तिच्या वडिलांची सुरुवातीला तयारी नव्हती. अभिनय क्षेत्रातील अनिश्चितता आणि त्यातील आव्हानांमुळे वडिलांचा अभिनेत्रीच्या निर्णयाला विरोध होता. अशा परिस्थितीत मधुराणीनं वडिलांना समजावण्यासाठी माधुरी दीक्षितच्या नावाचा आधार घेतला. ती म्हणाली, ‘बाबा, दीक्षितांची माधुरी करू शकते, तर गोखल्यांच्या मधुराणीला प्रयत्न तरी करू द्या!’

दरम्यान, मधुराणी प्रभुलकर आणि सचिन पिळगांवकर लवकरच ‘कापूसकोंडा‘ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं त्यांनी ‘कोण होणार करोडपती‘मध्ये हजेरी लावलेली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us