AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSMT वर खोळंबा, दादरवर फुल्ल जाम, भांडूपमध्ये एकाचा बळी; लोकल सेवा खोळंबली; सध्या स्थिती काय?

सोमवारी मध्य रेल्वेची सेवा सिग्नल बिघाडामुळे विस्कळीत झाली. पाच तास दुरुस्तीनंतरही वाहतूक संथ असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला. तर भांडूप येथे एसी लोकलने एका तरुणाचा बळी घेतला. संध्याकाळी दादरसह अनेक स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली असून, ज्यामुळे मुंबईकरांचा प्रवास त्रासदायक ठरत आहे.

CSMT वर खोळंबा, दादरवर फुल्ल जाम, भांडूपमध्ये एकाचा बळी; लोकल सेवा खोळंबली; सध्या स्थिती काय?
| Updated on: Oct 26, 2026 | 6:36 PM
Share

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक सोमवार सकाळपासूनच विस्कळीत झाली आहे. सकाळी १० वाजल्यापासून सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. तब्बल पाच तासांनंतर सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती करण्यात आली, मात्र त्यानंतरही रेल्वे वाहतूक पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे कामावर जाणाऱ्या आणि घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

मध्य रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत असल्याने प्रवाशांना तासन्तास लोकलची वाट पाहावी लागत आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाडाचा परिणाम संध्याकाळीही कायम असल्याने कार्यालयांतून सुटलेल्या नोकरदारांना घरी परतताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून, लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू आहे. मध्य रेल्वेची सेवा अद्याप सुरळीत न झाल्याने स्थानकांवरील गर्दी वाढतच आहे. अशी परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरही दिसत आहे.  तिथेही प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, फलाटांवर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना मार्ग काढणेही कठीण होत आहे.

भांडुप स्थानकात एसी लोकलची धडक; तरुणाचा मृत्यू

दरम्यान, रेल्वे वाहतूक विस्कळीत असतानाच भांडुप रेल्वे स्थानकावर एक दुर्दैवी घटना घडली. फलाट क्रमांक ३ येथे मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलची धडक बसल्याने एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकीकडे सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे लोकल सेवेला विलंब होत आहे, तर दुसरीकडे स्थानकांवरील वाढती गर्दी प्रवाशांसाठी अडचणीची ठरत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे कधी सुरळीत होणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

दादर रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्यानंतर त्याचा परिणाम अजूही दादर रेल्वे स्थानकात दिसून येत आहे. तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. दादर स्टेशनचे सर्व प्लॅटफॉर्म्स प्रवाशांना फुलून गेले असून रेल्वेची वाट पहात नागरिक ताटकळत उभे आहेत. अनेक जण बऱ्याच काळापासून उभे असून त्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. रेल्वेच्या या विस्कळीतपणामुळे प्रवासी त्रासले असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. कालच रविवामुळे मेगाब्लॉक होता, तरीही आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वेचा असा प्रॉब्लेम झाला. मेगा ब्लॉकमध्ये तुम्ही ट्रेन वगैरे बंद ठेवून काय करताय मग ? असा सवाल एका प्रवाशाने विचारला. आज जस्ट सोमवार उजाडलाय, एकही दिवस तुमची ट्रेन नीट चालत नाही, दररोज काही ना काही प्रॉब्लेम्स होतच राहतात. फक्त एक टेक्निकल फॉल्ट म्हणून घोषित केलं की संपलं. मग संडेच्या दिवशी ते फॉल्ट सुधारत का नाहीत ? असं विचारत प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

आज दुपारी माझा 1 ते 5 पेपर होता कॉलेजमध्ये, रोजच्याप्रमाणे मी 10.30 लोकल पकडली, पण कॉलेजमध्ये पोहोचेपर्यंत मला चक्क 3 वाजले. सुदैवाने माझं कॉलेज चांगलं आहे, त्यामुळे उशीर होऊनही त्यांनी मला पेपर लिहायची परवानगी दिली, एक्स्ट्रॉ वेळ हवा असेल तर देतो, असंही सांगितलं. पण  माझा आज पेपर चुकला असता माझं अख्ख वर्ष वाया गेलं असतं. याला कोण जबाबदार ?  रेल्वेचा हा जो कारभार आहे, जी अव्यवस्था आहे, त्याला प्रशासन जबाबदार आहे अशा प्रतिक्रिया आणखी एकाने दिली.

तर प्रशासनाने जो प्रॉब्लेम आहे तांत्रिकदृष्ट्या, तो विहीत कालावधीत सॉर्ट आऊट करायला पाहिजे , ते खूप गरजेचं आहे. याकडे प्रशासनाने पुरेसं लक्ष दिलं पाहिजे. मुंबईकरांची लाईफलाइन नीट सुरू राहील, याची काळजी घेती पाहिजे, अशी मागणी एका प्रवाशाने केली.

Follow Us
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार...
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, क्लिप बनवणारा.
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, ही क्लिप बनवणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी माहिती
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना...
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना फडणवीसांची स्पष्ट भूमिका
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी;
LIVE Vote Counting of MLC Election Results 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी; LIVE अपडेट्स एका क्लिकवर!
मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत,
मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत, कारण...
आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान
Tulja Bhavani Temple : आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान; तुळजापुरात भक्तीमय वातावरण