‘धक धक करने लगा’ गाण्याची रंजक कहाणी, 294 शब्दांच्या गाण्यात ‘धक-धक’ शब्द किती वेळा? ऐकून तुम्ही म्हणाल…

माधुरी दीक्षितचं 34 वर्षांपूर्वीचं सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट गाणं. धक-धक करने लगा या गाण्यात होते 294 शब्द. गाण्यात धक-धक हा शब्द किती वेळा? ऐकून तुम्ही व्हाल चकित.

‘धक धक करने लगा’ गाण्याची रंजक कहाणी, 294 शब्दांच्या गाण्यात ‘धक-धक’ शब्द किती वेळा? ऐकून तुम्ही म्हणाल...
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 01, 2026 | 3:48 PM

बॉलिवूडच्या 90च्या दशकातील गाण्यांची एक वेगळीच जादू होती. सुंदर धून, अर्थपूर्ण शब्द आणि कलाकारांचा रोमँटिक अंदाज यामुळे त्या काळातील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. असंच एक गाजलेलं गाणं म्हणजे ‘धक धक करने लगा’. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेटा’ चित्रपटातील या गाण्याने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळवली. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यातील माधुरीच्या रोमँटिक अंदाजाने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली.

‘धक धक करने लगा’ हे गाणं अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायलं होतं. गाण्याचे बोल समीर यांनी लिहिले, तर आनंद-मिलिंद यांनी संगीत दिलं. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्रीमुळे गाणं अधिकच लोकप्रिय झालं. या गाण्याच्या यशानंतर माधुरी दीक्षितला ‘धक-धक गर्ल’ म्हणून ओळख मिळाली.

Loading...

गाण्यात प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या मनातील भावना आणि वाढत्या धडधडीचं सुंदर चित्रण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे तब्बल 294 शब्द असलेल्या या गाण्यात ‘धक-धक’ हा शब्द एकूण 14 वेळा ऐकायला मिळतो. त्यामुळे गाण्याच्या मुखड्यापासून शेवटपर्यंत ‘धक-धक’ हा शब्दच या गाण्याची खास ओळख बनतो.

‘बेटा’ ठरला होता मोठा हिट

इंद्र कुमार दिग्दर्शित ‘बेटा’मध्ये अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत अरुणा ईरानी यांचीही महत्त्वाची भूमिका होती. 3 एप्रिल 1992 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या गाण्याच्या लोकप्रियतेत त्याची कोरिओग्राफीही महत्त्वाची ठरली. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी गाण्याची कोरिओग्राफी केली होती आणि त्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

आज 90च्या दशकातील गाण्यांची चर्चा झाली की ‘धक धक करने लगा’ हे नाव आवर्जून घेतलं जातं. माधुरी दीक्षितचा रोमँटिक अंदाज, अनिल कपूरसोबतची केमिस्ट्री, अनुराधा पौडवाल-उदित नारायण यांचा आवाज आणि लक्षात राहणारी धून यामुळे हे गाणं आजही रसिकांच्या मनात तितकंच लोकप्रिय आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us