Rasika Vengurlekar : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती, पोस्ट करत म्हणाली, नवी सुरुवात…
Maharashtrachi Hasyajatra Fame Actress : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीनं चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रसिका वेंगुर्लेकर हिच्यासाठी 2026 हे वर्ष खास ठरलं आहे. अभिनेत्रीचंं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रसिकानं पती अनिरुद्ध शिंदे याच्यासोबत नवीन घर खरेदी केलं. आपल्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
तिच्या नव्या घराची झलक पाहून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रसिकाने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये रसिकाच्या नव्या घराची सुंदर झलक पाहायला मिळते. पारंपरिक पद्धतीनं गृहप्रवेश करत तिनं नव्या घरात आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. 'नवं घर, नवी स्वप्नं आणि नवीन सुरुवात' असं कॅप्शन लिहीत अभिनेत्रीनं भावना व्यक्त केल्या आहेत.
रसिकाच्या व्हिडिओवर चाहत्यांनी आणि कलाकारांनी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.