दारु पिणं… छोटे कपडे घालणं… पुरुषांप्रमाणे…, महिलांबद्दल भाग्यश्रीचं खोचक वक्तव्य, Video व्हायरल

Bollywood Actress Bhagyashree: ब्रा जाळून टाकणं... दारु पिणं... छोटे कपडे घालणं... पुरुषांप्रमाणे..., महिलांबद्दल भाग्यश्री असं म्हणाली तरी काय? Video व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भाग्यश्रीच्या वक्तव्याची चर्चा...

दारु पिणं... छोटे कपडे घालणं... पुरुषांप्रमाणे..., महिलांबद्दल भाग्यश्रीचं खोचक वक्तव्य, Video व्हायरल
Bhagyashree
| Updated on: Feb 08, 2026 | 2:11 PM

Bollywood Actress Bhagyashree: अभिनेता सलमान खान याची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली भाग्यश्री आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील सोशल मीडियावर भाग्यश्री हिचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री महिला आणि पुरुष समानतेबद्दल बोलताना दिसत आहे… व्हिडिओमध्ये भाग्यश्री स्त्रीवादावर चर्चा करताना दिसली… ती स्त्री-पुरुष समानतेबद्दल देखील बोलते. भाग्यश्री काय म्हणते ते जाणून घेऊया.

मुलाखतीत भाग्यश्री म्हणाली, ब्रा जाळणं म्हणजे स्त्रीवादी होत नाही आणि छोटे कपडे घालणं देखील स्त्रीवादाला दुजोरा देत नाही… दारु पिणं… शिव्या देण… पुरुषांचा बरोबरी करणं… भाग्यश्री म्हणाली, ‘अनेक महिला स्त्रीवादाला वेगळ्या दृष्टीने पाहतात… याठिकाणी मी फक्त पुरुषांना दोष देणार नाही.

कारण महिला देखील तितक्याच जबाबदार आहेत… जेव्हा तुम्ही म्हणता की पितृसत्ताकता बऱ्याच काळापासून चालू आहे आणि आपल्याला बंड करायचं आहे. तर ब्रा जाळणाऱ्या महिला म्हणतात आम्हाला जे आवडतं ते आम्ही करणार… आम्हाला जे आवडतं ते आम्ही घालणार… जसं बोलायचं आहे, तसं आम्ही बोलणार… पण ही बरोबरी असूच शकत नाही?’

 

 

‘शिव्या देणं… वाईट व्यवहार करणं… छोटे कपडे घालणं… दारु पिणे… ही बरोबरी कशी झाली? कारण पुरुष असं करतात? हे सर्व महिलांना स्त्रीवादी बनवत नाही… समानता म्हणजे महिला आणि पुरुषांना त्यांच्या स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जीवनात समान संधी देणं.’

पुढे भाग्यश्री म्हणाले, ‘देवाने महिलांना काही नैसर्गिक गुण दिले आहेत. काळजी घेणं… कुटुंबियांचं पोषण करणं… अधिक भावूक… महिला पुरुषांपेक्षा अधिक सहनशील असतात. पुरुष शारीरिकदृष्ट्या संरक्षणात्मक असतात. त्यामुळे गुणांसोबत खांद्याला खांदा मिळवून काम केलं पाहिजे… एकमेकांसोबत स्पर्धा कशाला हवी… त्यामुळे देवाने जोड्या बनवल्या आहे..’ असं देखील भाग्यश्री म्हणाली.

भाग्यश्री हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री मोठ्या पडद्यावर आता सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.