Love Life | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू! खास फोटो समोर आल्यानंतर रंगल्या चर्चा

बॉलिवूडमध्ये बहरतेय आणखी एक 'लव्हस्टोरी', 'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू करतोय 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट! फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

Love Life | या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू! खास फोटो समोर आल्यानंतर रंगल्या चर्चा
| Updated on: Jul 04, 2023 | 10:58 AM

मुंबई | बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींचे सिनेमे बॉक्स ऑफिस फेल ठरले तरी, त्यांच्या खासगी आयुष्यातील ‘लव्ह स्टोरी’ मात्र हिट ठरते… आजपर्यंत बॉलिवूडमध्ये असंख्य नाती जुळली.. ९० च्या दशकातील सेलिब्रिटींची लव्हस्टोरी आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते. पण आता तर त्यांच्या मुलांची लव्हस्टोरी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. स्टारकिड्स कायम चर्चेत असतात. शिवाय त्यांचे अनेक खासगी फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अता देखील ‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्री हिच्या मुलाची लव्हस्टोरी चर्चेत आहे. अभिनेत्रीचा मुलगा अभिमन्यू बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. महत्त्वाचं म्हणजे, शुटिंगच्या सेटवरच दोघांमध्ये प्रेम बहरलं असं सांगण्यात येत आहे…

अभिनेत्री भाग्यश्री हिता मुलगा अभिमन्यू दसानी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आला आहे. बॉलिवूडच्या एक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत वाढत असलेल्या अभिमन्यूच्या भेटी चर्चेचा विषय ठरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अभिमन्यू ‘द फॅमेली मॅन’ वेब सीरिजमधील अभिनेत्री श्रेया धन्वंतरी हिला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे.

श्रेया आणि अभिमन्यू ‘नौसिखिये’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. दोघांनी भोपाळ याठिकाणी सिनेमाचं शुटिंग केलं आहे. रिपोर्टनुसार, शुटिंगसाठी भोपाळमध्ये दोघे जवळपास एक महिना एकत्र होते. याच दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं असं सांगण्यात येत आहे. दोघे रिलेशनशिप असल्याचं समोर येत आहे..

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘लस्ट स्टोरीज २’ सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान दोघांना एकत्र पाहिलं होतं. स्क्रिनिंग दरम्यान दोघांनी एकत्र फोटो देखील क्लिक केलं. पण अद्याप दोघांनी देखील नात्याची कबुली दिली नाही. अभिमन्यू याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘मर्द को दर्द नही होता’ सिनेमातून अभिमन्यूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं..

‘मर्द को दर्द नही होता’ सिनेमानंतर अभिमन्यू याने ‘निकम्मा’, ‘मिनाक्षी सुंदरेश्वर’, ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात अभिमन्यू आई भाग्यश्री आणि अभिनेता सलमान खान याच्यासोबत दिसला..

श्रेया धन्वंतरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘चुप’, ‘लूप लपेटा’ आणि ‘व्हाय चीट इंडिया’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. एवढंच नाही तरी, श्रेयाने ‘स्कॅम १९९२’ मध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. सध्या श्रेया आणि अभिमन्यू त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us