मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील विधान भोवले, डॉ. सेजल पवार हिच्याविरोधात कारवाई, थेट केईएम रुग्णालयाकडून तात्काळ..
KEM Hospital Doctor Sejal Pawar Apology : प्रणित मोरे याचा कॉमेडी शो अडचणीत सापडला आहे. नुकताच KEM रुग्णालयातील डॉक्टर सेजल पवार हिने वादग्रस्त विधान केले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. आता सेजल पवार हिच्यावर मोठी कारवाई केली जाणार आहे.

प्रणित मोरे (Pranit more) हा सध्या त्याच्या शोमध्ये पोहोचलेल्या महिला डॉक्टरने शेअर केलेल्या अनुभवामुळे गोत्यात सापडला. कॉमेडी शोमध्ये KEM रुग्णालयातील डॉक्टर सेजल पवार पोहोचली होती. यादरम्यान तिने प्रणित मोरे याला बोलताना थेट मृतदेहा संदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. तिने केलेल्या विधानाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. KEM रुग्णालय प्रशासनाकडूनही याची दखल घेण्यात आली. सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या जात होत्या. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समितीने संबंधित कॉमेडी शोचं संपूर्ण रेकॉर्डिंग बघितले. सेजल पवार हिच्या अडचणीत मोठी वाढ झाली. नुकताच या संदर्भातील प्राथमिक अहवाल पुढे आला.
डॉ. सेजल पवार हिच्या वक्तव्याची चाैकशी होणार आहे. सेजल पवार हिच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात प्राथमिक अहवाल पुढे आल्या, त्यानुसार तिच्यावर कारवाई होणार आहे. डॉक्टर सेजल पवार हिने मृतदेहा संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणात प्राथमिक अहवालात आक्षेपार्ह, असंवेदनशील वक्तव्य केल्याचा ठपका तिच्याविरोधात ठेवण्यात आला.
सेजल पवार हिच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. हा मोठा दणका म्हणावा लागेल. प्रणित मोरे याच्या कॉमेडी शोमध्ये डॉक्टर सेजल पवार हिने मृतदेहाच्या प्राव्हेट पार्टबद्दल हैराण करणारे विधान केले. सेजल पवार हिचे हे विधान ऐकून अनेकांनी भुवया उचावल्या. एक डॉक्टर असून ही अशाप्रकारचे विधान नक्की करू कशी शकते, असेही अनेकांनी म्हटले.
डॉक्टर सेजल पवार हिने व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर थेट एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून या प्रकरणात माफीही मागितली. KEM रुग्णालय प्रशासनाला तिच्याकडून लेखी माफीनामाही देण्यात आला. मात्र, आता प्राथमिक अहवाल पुढे आला असून तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. KEM रुग्णालयाचे डीन यांनी म्हटले आहे की, सध्या सेजल पवार ही परवानगी घेऊन तिच्या घरी गेली आहे. कठोरात कठोर कारवाई सेजल विरोधात करण्याची मागणी केली जात आहे.