‘मी त्याच्याकडून खूप शिकलो …’; भाऊ कदमच्या सेटवरील या सवयींमुळे अभिनेता मनोज वाजपेयी खूपच इम्प्रेस

बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयीचा ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून चित्रपटाची प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार आहे. एका मुलाखतीदरम्यान मनोज वाजपेयीने भाऊ कदम यांचं खूपच कौतुक केलं आहे. भाऊकडून खूप काही शिकायला मिळालं असं म्हणतं मोनज वाजपेयीने म्हटलं आहे.  

मी त्याच्याकडून खूप शिकलो ...; भाऊ कदमच्या सेटवरील या सवयींमुळे अभिनेता मनोज वाजपेयी खूपच इम्प्रेस
Manoj Bajpayee lavishly praised Marathi actor Bhau Kadam's performance in Inspector Zende
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 10, 2025 | 10:31 PM

बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयीचा ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून चित्रपटाची प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. सत्य घटनेवर आधारीत या चित्रपटात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. सचिन खेडेकर , भाऊ कदम, गिरीजा ओक, ओंकार राऊत, हरीश दुधाडे, वैभव मांगले असे दमदार मराठी कलाकार पाहायला मिळतात. या चित्रपटात या सर्वांच्या महत्वाच्या भूमिका पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन मरठी अभिनेता तथा दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी केलं आहे.

मनोज वाजपेयीने भाऊ कदमचं तोंडभरून केलं कौतुक 

दरम्यान चित्रपटाच्या प्रमोशन सुरु आहे. मनोज वाजपेयी, चिन्मय मांडलेकर, चित्रपटाची टीम प्रमोशन करताना दिसत आहे. अशाच एका मुलाखतीदरम्यान मनोज वाजपेयीने भाऊ कदमचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मनोजने भाऊ कदम यांच्यासोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण तरीही भाऊ कदम यांची काम करण्याची पद्धत, त्यांची भूमिकेसाठी तयारी हे सर्व पाहून मनोज वाजपेयी थक्क झाला. त्याने मुलाखतीत सांगितलं की भाऊ कदम सेटवर फार वेगळा माणूस दिसला. सतत कामाबद्दल विचार करणारा.

‘तो कायम त्याच्या भूमिकेचाच विचार करताना दिसतो’

मनोज वाजपेयीने म्हटलं, “भाऊ कदम यांना मी ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये पाहिलं होतं. भाऊ कदम यांच्याकडून मी खूप काही शिकलो. ते या सिनेमानिमित्त सतत आमच्याबरोबर होते. भाऊ कदम हे सेटवर कायमच शांत असायचे. काही बोलत नसायचे. त्यामुळे आपल्याला वाटतं की, त्यांची काही तयारी नसेल. पण भाऊ कदम हा असा अभिनेता आहे. तो जितका वेळ शूटिंग करत असतो. तितका वेळ त्याचं डोकं सतत सुरुच असतं. तो कायम त्याच्या भूमिकेचाच विचार करताना दिसतो”


‘तो खूपच हुशार आहेत’

मनोज वाजपेयीने पुढे म्हटलं , “भाऊ कदम एकच डायलॉग अनेक प्रकारे आपल्या डोक्यात तयार करत असायचा. तो इतकं शांत असायचा की, त्याच्या आजूबाजूला कोणालाच कळणार नाही की, भाऊ कदम नक्की काय विचार करतोय. तो माणूस खूप विचार करतो त्याच्या पात्राचा, त्याला दिलेल्या डायलॉगचा.मी कधीकधी सीनबद्दल त्यांच्याबरोबर चर्चा करायचो, तेव्हा तो त्याची मतं व्यक्त करायचा. तेव्हा मला जाणवलं की या माणसाचा भूमिकेबद्दलचा किती अभ्यास आहे. तो एक अभिनेता म्हणून खूपच हुशार आहेत. मलाही त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं.” असं म्हणत मनोजने भाऊ कदमचं कौतुक केलं.

मनोज वाजपेयी देखील भाऊ कमदच्या कामामुळे त्यांचा चाहताच झाला आहे.

भाऊ कदम यांच्याबद्दल बोलायचं तर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमधून आपल्या निरागस हास्याने आणि सहज अभिनयाने त्यांनी सर्वांची मनं जिंकली. टाइमपास, हाफ तिकीट, नशीबवान, सायकल, घे डबल, व्हीआयपी गाढव, पांडू अशा अनेक चित्रपटांतही भाऊ कदम यांनी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. आपल्या अभिनयाची नवीन बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली.त्यामुळेच भाऊ कदम यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आणि आता मनोज वाजपेयी देखील भाऊ कमदच्या कामामुळे त्यांचा चाहताच झाला आहे.