AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushil Inamdar : नाना पाटेकरांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्यानं घेतली नीलकांती आणि मल्हार यांची भेट, म्हणाला, नीलकांतीताईंना भेटल्यावर…

Sushil Inamdar : मराठी अभिनेता सुशील इनामदारनं नाना पाटेकर यांच्या निधनानंतर नीलकांती आणि मल्हार यांची भेट केली. अभिनेत्यानं सोशल मीडियावर डोळे पाणवणारी पोस्ट शेअर केली आहे.

Sushil Inamdar : नाना पाटेकरांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्यानं घेतली नीलकांती आणि मल्हार यांची भेट, म्हणाला, नीलकांतीताईंना भेटल्यावर...
| Updated on: Oct 13, 2026 | 4:53 PM
Share

नाना पाटेकर यांचं गोव्यात वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. नाना पाटेकर यांच्यावर पुण्याजवळील डोणजे गावात ‘नानाची वाडी‘ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी अभिनेता सुशील इनामदारनं नाना पाटेकर यांची पत्नी नीलकांती पाटेकर आणि मुलगा मल्हारची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. याबद्दल अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तसेच सुशीलनं ‘नानाची वाडी‘चा फोटोही शेअर केला आहे.

सुशील इनामदारची पोस्ट

सुशील इनामदार म्हणाला की, ‘आज नानाच्या घरी गेलो…म्हणजेच नानाच्या वाडीत! नीलकांतीताई आणि मल्ल्हार यांची भेट झाली. पण खरं सांगायचं, तर वाड्याच्या मुख्य दरवाजातून आत पाऊल ठेवल्याक्षणी सर्वप्रथम जाणवलं ते नानांचं अस्तित्व! ती वास्तू इतकी भारदस्त, इतकी जिवंत वाटली, की तिथल्या प्रत्येक कोपऱ्यात नानांच्या व्यक्तिमत्त्वाची जाणीव होत होती. असं क्षणभरही वाटलं नाही की, नाना आपल्यात नाहीत. खरंच, हे सगळं शब्दांत मांडणं कठीण आहे. नीलकांतीताईंना भेटल्यावर सुरुवातीला काय बोलावं, कसं बोलावं, त्यांचं सांत्वन कसं करावं, हेच कळत नव्हतं. कारण नीलकांतीताई स्वतः अनुभवांनी समृद्ध झालेल्या, कणखर व्यक्तिमत्त्वाच्या स्त्री आहेत. अशा व्यक्तीला आपण काय सांत्वन करणार? पण त्यांच्या अनुभवाची, समजूतदारपणाची पुन्हा एकदा जाणीव झाली.’

‘आम्ही त्यांना भेटायला गेलेली पाच माणसं निलू ताई यांच्या बरोबर स्टार प्रवाह वरील ‘गोठ’ या मालिकेत आम्ही एकत्र काम केले होते (नमिता नाडकर्णी वर्तक , रवि करमरकर, विघ्नेश कांबळे, रोहन सामंत आणि मी )… सगळ्यांच्याच मनात खूप काही होतं, पण बोलण्यासाठी शब्दच फुटत नव्हते. आमची ती अवस्था त्यांच्या लक्षात आली असावी. त्यांनीच दुसरा विषय काढला, आम्हाला बोलतं केलं. मग एकत्र काम केलेल्या ‘गोठ’च्या दिवसांच्या आठवणी निघाल्या. जुन्या गोष्टी आठवल्या आणि खूप दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावरचं, गालातल्या गालात हसणारं ते हास्य पाहायला मिळालं. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे नाना आता सोबत नाहीत, या सत्याची जाणीव आणि त्यांचं दुःखही सतत जाणवत होतं.’

‘नीलकांतीताई आणि मल्ल्हार या दोघांचं दुःख जणू आपल्याच घरातलं आहे, असं वाटत होतं. त्यांचं दुःख आपण दूर करू शकत नाही, पण त्याची जाणीव मात्र मनाला सतत होत होती. छान गप्पा झाल्या. निघताना नीलकांतीताईंना घट्ट मिठी मारली. आणि त्या स्वतःहून म्हणाल्या…“तुम्ही काळजी घ्या रे!” किती साधे शब्द…पण त्या शब्दांमागची भावना किती मोठी! आयुष्य आणि मृत्यू यांच्यामध्ये खरंच कितीसं अंतर असतं? कदाचित दोन मिनिटांचं, दोन क्षणांचं, दोन श्वासांच….’

‘तिथून निघाल्यानंतर आम्ही मुंबईच्या दिशेने परतलो. पण खरंच, नाना त्या वास्तूतून निघून गेलेत, असं अजिबात वाटत नाही. उलट, मला असं वाटतं की, त्या वाड्यात नानांचं अस्तित्व कायम राहणार आहे. तिथली असंख्य झाडं… त्यातली त्यांनी स्वतःच्या हातांनी लावलेली काही झाडं…वाड्याच्या बाजूला असलेली ती प्रशस्त, सुंदर विहीर…तिच्या खोलीसारखंच नानांचं मनही किती खोल आणि विशाल असावं, याची जाणीव करून देणारी ती वास्तू! त्या परिसरात पसरलेला निसर्ग पाहताना जाणवत होतं की, नानांनी केवळ स्वतःसाठी काही उभं केलं नाही, तर शेतकऱ्यांसाठी आणि तिथल्या माणसांसाठीही खूप काही केलं आहे.’

‘कधी कधी एखाद्या माणसाचं मोठेपण समजून घ्यायला त्याच्याबद्दल फार काही ऐकण्याची गरज नसते. त्याने मागे ठेवलेल्या गोष्टी, त्याने जपलेली माणसं आणि त्याच्या कामातून उमटलेला ठसा बरंच काही सांगून जातो. नानांची वाडी पाहताना हे सगळं मनापासून जाणवलं. काही माणसं शरीराने आपल्यातून निघून जातात; पण त्यांनी निर्माण केलेलं अस्तित्व, त्यांनी जपलेली माणसं आणि त्यांनी केलेलं काम त्यांना कायम जिवंत ठेवतं. नानांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!’ असं अभिनेत्यानं शेवटी म्हटलं आहे.

Follow Us
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय