अश्लील कंटेंटच्या नादात सर्व काही गमावलं! या 5 ओटीटी प्लॅटफॉर्म विरोधात मोठी कारवाई

अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेन्ट प्रदर्शित केल्याच्या आरोपाखाली सरकारने पाच ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहेत. आयटी नियम 2021 नुसार केलेल्या या कारवाईमुळे आता वापरकर्त्यांसाठी या अ‍ॅप्सचा प्रवेश पूर्णपणे ब्लॉक झाला आहे.

अश्लील कंटेंटच्या नादात सर्व काही गमावलं! या 5 ओटीटी प्लॅटफॉर्म विरोधात मोठी कारवाई
OTT watching
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 25, 2026 | 1:00 PM

आजकाल अनेकजण चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाण्यापेक्षा घर बसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहणे पसंत करतात. काही जण तर सतत ओटीटी प्लॅटफॉर्मवर सीरिज पाहात असतात. देशात ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असे असताना सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर कठोर भूमिका घेतली आहे. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) अश्लील कंटेंट स्ट्रीम करण्याच्या आरोपाखाली पाच ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स ब्लॉक केले आहेत. हा निर्णय आयटी कायद्याच्या कलम ६९ए आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोडच्या नियमांनुसार घेण्यात आला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या प्लॅटफॉर्म्सविरोधात अनेकदा तक्रारी आल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सांगितले जात आहे की, या अॅप्सवर दाखवला जाणाऱ्या काही कंटेंटवर बराच काळ आक्षेप घेतला जात होता.

कोणते ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बॅन?

समोर आलेल्या यादी नुसार, MoodXVIP, Koyal Playpro, Digi Movieplex, Feel आणि Jugnu हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स ब्लॉक करण्यात आले आहेत. आरोप आहे की, हे प्लॅटफॉर्म्स बराच काळ आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट दाखवत होते. याच कारणाने आता इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना या अॅप्सची पोहोच रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून युजर्स त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत.

यापूर्वीही कारवाई झाली आहे

ही पहिली वेळ नाही जेव्हा सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर कारवाई केली आहे. यापूर्वी जुलै 2025 मध्येही 25 ओटीटी प्लॅटफॉर्म्स अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट दाखवण्याच्या आरोपाखाली ब्लॉक करण्यात आले होते. या प्लॅटफॉर्म्सना सप्टेंबर 2024 मध्ये चेतावणी देण्यात आली होती आणि फेब्रुवारी 2025 मध्ये नियमांचे पालन करण्याची सूचना जारी करण्यात आली होती. तरीही काही प्लॅटफॉर्म्समध्ये सुधारणा दिसली नव्हती.

तक्रारींनंतर घेतला निर्णय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅटफॉर्म्सवर असे सीन दाखवले जात होते ज्यात अतिशय बोल्ड आणि आक्षेपार्ह कंटेंट समाविष्ट होता. काही प्रकरणांमध्ये कौटुंबिक संबंधांशी संबंधित चुकीचे सीनही दाखवले गेले होते. इतकेच नाही तर अनेकदा ब्लॉक झाल्यानंतर नवीन डोमेन बनवून पुन्हा स्ट्रीमिंग सुरू करण्याचा प्रयत्नही केला गेला होता. सध्या जे पाच ओटीटी प्लॅटफॉर्म्स ब्लॉक करण्यात आले आहेत, त्यापैकी कोणत्याही अॅपने याबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. आयटी नियम 2021 नुसार आता या अॅप्सची पोहोच पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात सरकार डिजिटल प्लॅटफॉर्म्सची देखरेख आणखी कठोर करू शकते.