शाहिद कपूरच्या कोणत्या सवयीचा मीराला होतो त्रास ? उत्तर ऐकून अभिनेत्याची बोलतीच बंद !

‘द ग्रेट इंडिअन कपिल शर्मा शो’ मध्ये आलेली मीरा राजपूत पहिल्यांदाच टीव्हीवर दिसणार आहे. शाहिद कपूरची त्रासदायक सवय कोणती ते ‘उड़ता पंजाब’ चे अनेक मजेदार किस्से तिने यावेळेस सांगितले.

शाहिद कपूरच्या कोणत्या सवयीचा मीराला होतो त्रास ? उत्तर ऐकून अभिनेत्याची बोलतीच बंद !
| Updated on: Oct 28, 2026 | 8:29 PM

‘द ग्रेट इंडिअन कपिल शर्मा शो’ या फॅमिली कॉमेडी शो चा अपकमिंग दिवाळी एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलीज झालाय. या भागात अभिनेता शाहिद कपूर , त्याची पत्नी मीरा सोबत आला. या एपिसोडद्वारे मीरा राजपूत ही पहिल्यांदाच टीव्हीवर दिसणार आहे. शाहिद कपूरशी लग्न झाल्यावर मीरा अनेकदा सोशल मीडिया आणि सार्वजनिक इव्हेंट्समध्ये दिसली, पण यावेळी ती पहिल्यांदाच एखाद्या टेलिव्हिजन शोमध्ये दिसेल. एवढंच नाही तर शाहीद -मीरासोबत अभिनेता ईशान खट्टरही या एपिसोडमध्ये पाहुणा म्हणून येणार आहे. या भागत तिघांनीही एकमेकांची खिल्ली उडवली आणि एकमेकांसोबत मजाही केली. याच भागात मीराने अनेक गुपितं उलगडली. शाहिदच्या ज्या सवयीमुळे मीरा वैतागली ती सवय कोणती याचाही तिने याच एपिसोडमध्ये खुलासा केला.

शाहिद कपूरच्या सवयींवर मीरा म्हणाली..

Loading...

कपिल शर्माच्या आगामी शोमध्ये शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्यातील मजेशीर केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. शोच्या प्रोमोमध्ये कपिल शर्माने मीराला शाहिदच्या अशा एका सवयीबद्दल विचारलं, जी तिला सर्वाधिक त्रासदायक वाटते. यावर मीराने गंभीर चेहऱ्याने प्रतिप्रश्न केला, “एक?” तिचं हे उत्तर ऐकताच शाहिद कपूर काही क्षणांसाठी गप्प झाला, तर उपस्थित प्रेक्षक हसून लोटपोट झाले. मीराच्या या प्रतिक्रियेमुळे शाहिदच्या अनेक सवयी तिला त्रासदायक वाटत असाव्यात, असा मजेशीर अंदाज लावला जात आहे. मात्र, शाहिदच्या नेमक्या कोणत्या सवयींमुळे मीरा वैतागते, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. प्रोमोमध्ये हा प्रसंग विनोदी पद्धतीने दाखवण्यात आला असून, त्यामुळे आगामी भागाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

शाहिद मुलांना लाडावतो ?

या भागात आणखी एक रंजक प्रसंग पाहायला मिळणार आहे. शाहिद कपूर मुलांना कशा पद्धतीने वाढवतो, असा प्रश्नही विचारण्यात आला होता. त्यावर मीरा म्हणाली, “ शाहिद मुलांना लाडावतो, पण वाईट अर्थाने नाही.” तिच्या या उत्तरावर शाहिदनेही विनोदी अंदाजात प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “ हो, बाइक वेगाने चालवतो, पण सुरक्षितपणे चालवतो. मुलांना लाडावतो पण वाईट अर्थाने नाही!” त्याच्या या उत्तरामुळे कार्यक्रमात हास्याची कारंजी उडालीय

‘उडता पंजाब’ पाहताना शाहिदपासून दूर जाऊन बसली मीरा !

शोदरम्यान शाहिद कपूरने त्याच्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटाशी संबंधित एक मजेशीर किस्साही सांगितला. या चित्रपटात शाहिदने अमली पदार्थांच्या व्यसनाशी झुंजणाऱ्या एका रॉकस्टारची भूमिका साकारली होती. चित्रपट पाहताना मीरा त्याच्याजवळ बसली होती. मात्र, चित्रपट संपेपर्यंत ती सोफ्याच्या दुसऱ्या टोकाला जाऊन बसली, असं शाहिदने सांगितलं. शाहिदचा हा किस्सा ऐकल्यानंतर कपिल शर्मा यानेही त्याची फिरकी घेतली. “मीराला शाहिदचा ‘कबीर सिंह’ चित्रपट दाखवला असता, तर कदाचित ती पळूनच गेली असती,” अशी मिश्किल टिप्पणी कपिलने केली.

या सगळ्या मजेशीर प्रसंगांमुळे कपिल शर्माच्या शोचा आगामी भाग मनोरंजनाने भरलेला असणार आहे. शाहिद आणि मीरामधील गमतीदार संवाद, रश्मिकाचा खुलासा आणि कपिलचे विनोद यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसण्याची संधी मिळणार आहे. ‘द ग्रेट इंडिअन कपिल शर्मा शो’चा हा दिवाळी स्पेशल एपिसोड 31 ऑक्टोबरला रात्री 8 वाजता नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us