बॉक्स ऑफिसवर 'मिशन मंगल'चा धुमाकूळ, तीन दिवसात किती कमाई...

स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी अभिनेता अक्षय कुमारचा मिशन मंगल सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

बॉक्स ऑफिसवर 'मिशन मंगल'चा धुमाकूळ, तीन दिवसात किती कमाई...

मुंबई : स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी अभिनेता अक्षय कुमारचा मिशन मंगल सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सिनेमाने शानदार कमाई केली. तसेच तिसऱ्या दिवशीही सिनेमाने मोठी कमाई केली. मिशन मंगलने तिसऱ्या दिवशी 23.58 कोटी रुपयांची कमाई केली.

“मिशन मंगलच्या कमाईत तिसऱ्या दिवशी वाढ दिसली. सिनेमाने मेट्रो सिटी आणि इतर छोट्या-मोठ्या शहरातून शानदार कमाई केली. रविवारी या आकड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे”, असं चित्रपट ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करत म्हटले.

गुरुवारी मिशन मंगलने 29.16 कोटी, शुक्रवारी 17.28 कोटी आणि शनिवारी 23.58 कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमाने तीन दिवसात एकूण 70.02 कोटी रुपयांची कमाई केली.

15 ऑगस्ट रोजी अभिनेता अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ आणि अभिनेता जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हे दोन सिनेमे एकत्र प्रदर्शित झाले. यामुळे या दोन्ही सिनेमामध्ये मोठी टक्कर पाहायला मिळत आहे. दोन्ही सिनेमा मोठ्या प्रमाणात कमाई करत आहेत. यापूर्वीही अक्षयच्या ‘गोल्ड’ आणि जॉनच्या ‘सत्यमेव जयते’ची टक्कर बॉक्स ऑफिसवर झाली होती. त्यावेळीही दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.

स्वातंत्र्य दिनी सिनेमा प्रदर्शित झाल्याने सिनेमाला चांगला फायदा झाला. मिशन मगल सिनेमाचे दिग्गदर्शन जगन शक्ती यांनी केले. सिनेमामध्ये अक्षय कुमार एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, कृती कुल्हारी प्रमुख भूमिकेत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *