AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mithun Chakraborty : 75 वर्षीय मिथून चक्रव्रर्तींचा व्हिलचेअरवर बसून बोल्ड डान्स, नोराचा हात पकडून…सोशल मीडियावर चर्चा

‘जेलर २’मधील मिथुन चक्रवर्ती आणि नोरा फतेही यांच्या डान्स सीनची चर्चा सुरू आहे. 75 वर्षीय मिथूनदा आणि 42 वर्षीय नोरा यांचा बोल्ड डान्स पाहून चाहत्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. त्यामुळे या मिथूनदा विषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

Mithun Chakraborty : 75 वर्षीय मिथून चक्रव्रर्तींचा व्हिलचेअरवर बसून बोल्ड डान्स, नोराचा हात पकडून...सोशल मीडियावर चर्चा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2026 | 5:43 PM
Share

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी आपल्या अभिनयाने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. वयाच्या अगदी 75 व्या वर्षांपर्यंत ते अनेक सिनेमांमध्येही काम करताना दिसत आहेत. रजनीकांत यांच्यासोबत त्यांनी जेलर 2 या सिनेमात स्क्रिन शेअर केली आहे. 15 ऑक्टोबरला जेलर 2 हा सिनेमा सिनेमागृहात रिलीज झाला आहे. त्यामुळे सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहेत.

परंतु सध्या चर्चा एका वेगळ्याच गोष्टीची सुरू आहे. जेलर 2 मध्ये नोरा फत्तेही आणि मिथून चक्रव्रती यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय. त्या दोघांच्या बोल्ड डान्सची सगळीकडे चर्चा सुरू आहे. वयाची 75 पार केलेले मिथुनदा आणि 42 वर्षांची नोरा यांचा हा अंदाज पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.एका ज्येष्ठ्य अभिनेत्याने अशाप्रकारे डान्स करणं यावरून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे.

नोरा फतेही ही बोल्ड डान्स आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. जेलर 2 मधील तिच्या उत्कृष्ट डान्सची आणि मादक अदांची सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र या गाण्यात मिथून चक्रव्रर्तीही तिच्या सोबत दिसत असल्याने प्रेक्षकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. गाण्यामध्ये मिथून चक्रव्रर्ती व्हीलचेअरवर बसलेले आहेत. त्यांच्या पुढ्यात नोरा डान्स करताना दिसत आहे. तसेच मिथूनदाही नोरासोबत व्हिलचेअरवर बसूनच थिरकताना दिसत आहेत. नोरा सुद्धा मिथूनदा यांचा हात पकडून त्यांच्यासमोर बोल्ड डान्स करताना दिसत आहे. दोघांच्या वयाच मोठं अंतर असताना त्यांचा हा अंदाज अनेकांना खटकला आहे.

मिथून चक्रव्रर्ती हे हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांच्या अभिनयाचा आणि नृत्याचा मोठा चाहतावर्गही आहे. त्यामुळे त्यांना अशा बोल्ड गाण्यात नाचताना पाहून काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वयात अशा गाण्यात सहभागी होण्याची गरज काय असा सवालही चाहते कमेंट्सच्या माध्यामातून विचारताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काही चाहत्यांनी कलाकारांच्या वयावरून त्यांना ट्रोल करणे योग्य नसल्याचंही म्हटलं आहे.आता या डान्सवरून सुरू झालेली ही चर्चा किती काळ सुरू राहते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा