AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत, राजसाहेब बरोबर बोलले होते, हे तुला फसवणार : अविनाश जाधव

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग झालं. पण या स्क्रीनिंगमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळालं. सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना जागा न मिळाल्याने पानसे स्क्रीनिंग सोडून निघून गेले. यावर बोलताना मनसेचे ठाणे-पालघरमधील नेते अविनाश जाधव यांनी अभिजित पानसे यांना समर्थन देत, राज ठाकरेंच्या एका विधानाचीही आठवण करुन दिली. अविनाश […]

अभिजीत, राजसाहेब बरोबर बोलले होते, हे तुला फसवणार : अविनाश जाधव
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM
Share

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग झालं. पण या स्क्रीनिंगमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळालं. सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना जागा न मिळाल्याने पानसे स्क्रीनिंग सोडून निघून गेले. यावर बोलताना मनसेचे ठाणे-पालघरमधील नेते अविनाश जाधव यांनी अभिजित पानसे यांना समर्थन देत, राज ठाकरेंच्या एका विधानाचीही आठवण करुन दिली.

अविनाश जाधव काय म्हणाले?

“आज परत तेच झालं. शिवसेनेने अभिजित पानसेचा वापर केला. पहिल्यांदा आदित्य ठाकरेला तयार करण्यासाठी आणि आज ‘ठाकरे’ सिनेमा बनवण्यासाठी. राजसाहेब बरोबर बोलले होते, अभिजित हे तुला फसवणार.”, असे ट्वीट मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केले आहे.

सोशल मीडियावर मनसेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी #ISupportAbhijitPanse नावाची मोहीमही सुरु केली आहे. त्यावरुन मनसे कार्यकर्ते अभिजीत पानसेंचं समर्थन करण्यासह शिवसेनेवर टीकाही करत आहेत. त्यामुळे या सिनेमामुळे हे दोन पक्ष अधिक जवळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना, दुरावाच अधिक निर्माम होताना दिसतोय.

अभिजित पानसे स्क्रीनिंग सोडून माघारी

मुंबईत होणाऱ्या या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दिग्गज नेते आणि इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. पण स्वतः दिग्दर्शकच नाराज झाल्यामुळे कुजबुज पाहायला मिळाली. अभिजित पानसे यांना सर्वात पुढचं सीट दिल्यामुळे ते नाराज झाल्याचं बोललं जातंय. संजय राऊत यांनी पानसेंची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. पण यात त्यांना यश आलं नाही. पानसे कुटुंबासह घरी निघून गेले. अभिजित पानसे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे, तर संजय राऊत यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

खरं तर अभिजित पानसे हे दिग्दर्शक असण्यासोबतच मनसेचे नेतेही आहेत. मनसे आणि शिवसेनेचा छत्तीसचा आकडा आहे. पण सिनेमासाठी संजय राऊत यांनी अभिजित पानसेंसारख्या अनुभवी आणि कुशल दिग्दर्शकाची निवड केली होती. या सिनेमासाठी मनसेने अभिजित पानसेंना पोस्टरबाजी करत शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरवर कुठेही संजय राऊत यांचं नाव किंवा फोटो नाही.

कोण आहेत अभिजित पानसे?

अभिजित पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत. 2014 मध्ये आलेला रेगे हा मराठी सिनेमा प्रचंड गाजला होता. रेगे हे अभिजित पानसे यांचं मोठं यश असल्याचं मानलं जातं. ठाकरे सिनेमासाठीही संजय राऊत यांनी अभिजित पानसे यांची निवड केली.

वाचा – ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले

अभिजित पानसे सिनेमाव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय असतात. पानसे यांनी चित्रपट सेनेची जबाबदारी सांभाळलेली आहे. राज ठाकरेंच्या जवळचे नेते म्हणून ते परिचित आहेत. अगोदर शिवसेनेत असलेले अभिजित पानसे नंतर मनसेत आले होते. त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूकही लढली होती.

वाचा – ... म्हणून अभिजित पानसे स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.