AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Search 2020 : हे तर नवलच! 2020मध्ये नेहा कक्करच्या प्रेग्नेंसीबाबत गुगलवर सर्वाधिक सर्च

2020मध्ये भारतातील लोकांनी नेहा कक्करच्या प्रेग्नेंसीबद्दल शोध घेतला आहे.(Most searches on Google about Neha Kakkar's pregnancy )

Google Search 2020 : हे तर नवलच! 2020मध्ये नेहा कक्करच्या प्रेग्नेंसीबाबत गुगलवर सर्वाधिक सर्च
| Updated on: Dec 23, 2020 | 4:02 PM
Share

मुंबई : आता 2020 चा शेवटचा महिना संपत आला आहे, या वर्षाची सुरुवातच कोरोनानं झाली. कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि सगळ ठप्प झालं, अशा वेळी लोकांनी मनोरंजनासाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला. आता गुगलनं ‘सर्च 2020’ ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये या वर्षाचा टॉप ट्रेंड सांगितला गेलाय. या वर्षी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये लोकांनी सर्वात जास्त काय सर्च केलं हे या यादीत आहे. तर 2020मध्ये भारतातील लोकांनी नेहा कक्करच्या गरोदरपणाबद्दल शोध घेतला आहे. सोशल मीडियावर लोकांनी नेहा कक्करच्या प्रेग्नेन्सीच्या बातम्यांविषयी सर्वाधिक सर्च केलं आहेत. यावर्षी सर्वाधिक शोधल्या गेलेल्या बातम्या म्हणजे कोरोना नसून नेहाची प्रेग्नंसी आहे.

बॉलिवूडची सिंगिंग क्वीन म्हणून ओळखली जाणारी नेहा कक्करनं नुकतंच तिच्या नवीन गाण्याचं प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिनं तिच्या इंस्टाग्राम पेजवर पती रोहनप्रीतसोबत बेबी बंप फ्लॉन्ट करत एक फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत तिनं ‘ख्याल रखया कर’ असं कॅप्शन दिलं होतं. हा फोटो व्हायरल होताच नेहाच्या प्रेग्नेंसीबद्दल जाणून घेण्यासाठी लोकांनी गुगलवर सर्च करण्यास सुरवात केली आणि नेहा कक्करसंबंधित प्रत्येक माहिती मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. नेहा कक्कर प्रेग्नेंट नसून तिच्या नवीन गाण्याचा हा लूक होता. नेहाचं हे गाणं 22 डिसेंबरला रिलीज झालं आहे.

गाण्याच्या प्रमोशनसाठी नेहानं पुन्हा एकदा चाहत्यांना वेडं केलं. तिनं तिच्या आगामी गाण्याच्या प्रमोशनसाठी प्रेग्नेंसीच्या बातम्यांचा वापर केला आहे. नेहानं तिच्या आणि रोहनच्या लग्नाआधी असाच पब्लिसिटी स्टंट केला होता.’नेहू दा व्याह’ या गाण्यात दोघांचं लग्न दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर दोघं खरच लग्नबंधनात अडकले.

नेहा आणि रोहन यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितलं की हे दोघं ऑगस्ट 2020 मध्ये ‘नेहू दा व्याह’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान भेटले. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.