Juhi Chawla: जगभरातील 2000 पाहुण्यांना निमंत्रण दिलं पण सासूने रद्द केलं लग्न, अखेर जुहीने घरातच अब्जाधीशासोबत घेतल्या सप्तपदी
Juhi Chawla Grand Wedding Cancelled: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हिचं लग्न तर ठरलेले, जगभरातील 2000 पाहुण्यांना लग्नाचं निमंत्रण देखील पाठवलं, पण सासूने लग्न रद्द केल्यानंतर जुहीने अब्जाधीशासोबत घरातच लग्न उरकलं... आज ती जगयेत आलिशान आयुष्य

Juhi Chawla Grand Wedding Cancelled: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला आज बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. जुहीच्यासोबत जय मेहता यांचं दुसरं लग्न आहे. पण या लग्नापूर्वी देखील मोठ्या अडचणी आल्या. जुही चावला आणि जय मेहता यांच्या लग्नाचं जगभरातील तब्बल 2 हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. पण अभिनेत्रीच्या सासूने लग्न रद्द केलं. अशात जुही आणि जय मेहता यांनी घरात काही लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकलं होतं… याबद्दल खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केलेला.
रद्दा झालेलं जुही चावला – जय मेहता यांचं लग्न
सांगायचं झालं तर, जुही चावला कधीच तिच्या खासगी आयुष्याबद्दल काहीही सांगत नाही. पण 2024 मध्ये गुजरात चेंबर्स ऑफ कॉमर्स एन्ड इंडस्ट्रीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जुही हिने स्वतःच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केलेला. या भव्य लग्नासाठी तब्बल 2 हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवलं होतं. पण आईच्या निधनानंतर जुही प्रचंड भावूक झालेली, ज्यामुळे स्वतः सासून भव्य लग्न रद्द केलं.
जुही म्हणालेली, ‘माझ्या करियरमध्ये मी अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिलेले, काही सिनेमांचं शुटिंग सुरु होतं आणि माझं लग्न ठरलेलं. माझ्या आईचं निधन देखील वर्षभरापूर्वी झालेलं, जेव्हा लग्नाची तारीख जवळ आली, तेव्हा मी सतत एकच विचार करत होती, माझी आई जिने माझ्यावर सर्वात जास्त प्रेम केलं. आता ती या जगात नाही आणि लग्नानंतर माझं करियर देखील संपेल.. मला कळत नव्हतं, लग्नासाठी आनंदी राहू की दुःखी. एकदा मी प्रचंड रडली आणि माझ्या सासूला सर्वकाही सांगितलं. ‘
पुढे जुही म्हणाली, ‘सासूला सर्वकाही सांगितल्यानंतर, त्या म्हणाल्या ठिक आहे, काही हरकत नाही? विचार करा, तुमची सासू तुमच्यासाठी असं करत असेल तर? जवळपास 2 हजार लोकांना निमंत्रण पाठवलं होतं, त्यांनी सर्वांनी फोन करुन सांगितलं, ‘आता लग्न होत नाहीये. त्यांनी लग्न मोठं न करण्यासाठी सर्व कुटुंबियांची समज घातली. माझ्याच घरी जवळपास 100 लोकांच्या उपस्थितीत माझं लग्न झालं… विचार करा तुमची सासू जगभरातील सर्व पाहुण्यांना येण्यासाठी स्पष्ट नकार देते, ज्यांना निमंत्रण पाठवण्यात आलेली..’, असं देखील जुही म्हणालेली.