Madhuri Dixit : लग्न होताच माधुरीच्या सासूबाईंनी असं काय केलं, ज्यामुळे आजही अभिनेत्री.. अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा
Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल आज सर्वांमा माहिती आहे, पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार काही समोर आलं नाही, आता स्वतः माधुरीनेच लग्नानंतर सासूबाईंनी काय केलं होतं, याचा किस्सा सांगितला आहे...

Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत बॉलिवूड राज्य केल आणि चाहत्यांची ‘धकधक गर्ल’ झाली. बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर माधुरीने गुपचूप लग्न उरकलं. तिच्या लग्नाबद्दल कोणाला काहीच माहिती नव्हतं. कारण माधुरीचं लग्न अमेरिकेतील तिच्या मामांच्या घरी गुपचूप झालं. तेव्हा लग्नानंतर माधुरीच्या सासूबाईंनी त्यांच्या लग्नाचे फोटो लपवून ठेवलेले. ते आजपर्यंत कोणालाच भेटले नाही. याबद्दल माधुरीने अनेक वर्षांनंतर सांगितलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी दीक्षित हिची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, माधुरी सध्या ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात होस्टची जबाबदारी सांभाळत आहे. शोमध्ये माधुरी दीक्षित तिच्या कुटुंबातील सदस्यांचे देखील किस्से सांगत आहे. आता देखील अभिनेत्रीने तिच्या लग्नातील एक किस्सा सांगितला आहे. माधुरी हिने जेव्हा डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं, तेव्हा कोणालायच काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे जेव्हा लग्नाचे फोटो आले, तेव्हा अभिनेत्रीच्या सासूने त्यांच्या लग्नातील फोटो सुरक्षित राहावेत म्हणून लपवून ठेवलेले, पण ते फोटो आजपर्यंत अभिनेत्रीला सापडलेच नाहीत..
सोशल मीडियावर माधुरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती सासूबाईंचा किस्सा सांगताना दिसत आहे. माधुरी म्हणाली, ‘एकदा माझ्या सासूबाईंनी असंच केलं. कारण आमच्या लग्नाबद्दल कोणाला काहीच माहिती नव्हतं, का आमचं लग्न झालं आहे. तेव्हा लग्नाचे फोटो आल्यानंतर सासूबाईंनी फोटो कोणाला आमच्या लग्नाबद्दल कळू नये म्हणून लपवून ठेवलेले. लग्न जाहिर केलं नाही म्हणून फोटो मी कुठेतरी लपवून ठेवते… असं सासूबाई म्हणाल्या. पण ते फोटो इतके सुरक्षित ठेवले आहेत की, आजपर्यंत कोणाला मिळालेच नाहीत…’ हा किस्सा माधुरीने विनोदी अंदाजात सांगितला.
माधुरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘कोण होणार करोडपती’ शोमुळे चर्चेत आहे. शोमध्ये आपर्यंत सोनाली बेंद्र, आदिनाथ कोठारे, रेणुका शहाणे, प्रिया बेर्डे यांनी हजेरी लावली. त्यांच्यासमोर देखील माधुरीने तिच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. माधुरी आता सिनेमांमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते.