MOVIE REVIEW GOOD NEWWZ : चाहत्यांसाठी ‘गुड न्यूज’

हे वर्ष संपता संपता अक्षयनं पुन्हा एकदा प्रेक्षकांना 'गुड न्यूज' (Movie Review Good Newwz) दिली आहे. त्यामुळे कलाकारांचा दमदार अभिनय, उत्तम मांडणी, कसलेलं दिग्दर्शन, हटके विषय यामुळे ही 'गुड न्यूज' हवीहवीशी वाटणारी आहे.

MOVIE REVIEW GOOD NEWWZ : चाहत्यांसाठी 'गुड न्यूज'
Follow us
| Updated on: Dec 27, 2019 | 8:04 PM

मोठ्या शहरांमध्ये अतिमहत्त्वाकांक्षेमुळे जोडपी लवकर फॅमिली प्लॅनिंग करत नाहीत. मात्र जेव्हा त्यांना हे सुख हवं असतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कारण वाढत्या वयामुळे शरीरात बदल झालेले असतात. मग त्यांना आयव्हीएफ, टेस्ट ट्युब बेबी सारख्या टेस्टचा आधार घ्यावा लागतो. जर का या टेस्टमध्ये काही गडबड झाली तर काय होऊ शकतं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न ‘गुड न्यूज’ या (Movie Review Good Newwz) सिनेमात करण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री करीना कपूर खान, दिलजीत दोसांझ, कियारा अडवाणी अशी तगडी स्टारकास्ट मंडळी आहेत. ख्रिसमस आणि न्यू ईअरचा मुहुर्त साधत प्रदर्शित झालेला हा सिनेमा खरतर प्रेक्षकांसाठी ‘गुड न्यूज’चं (Movie Review Good Newwz) म्हणावी लागेल. कारण एक धमाल फन, इमोशनल राईड त्यांना या सिनेमात अनुभवता येणार आहे. सिनेमाच्या कथेत दम असेल तर नक्कीच चांगली कलाकृती होते हे यानिमित्तानं पुन्हा एकदा सिध्द झालं आहे.

सिनेमाची कथा मजेशीर आहे. वरुण बत्रा (अक्षय कुमार) आणि दीप्ती बत्रा (करीना कपूर खान) दोघांचीही महत्त्वाकांक्षा मोठी असते. त्यामुळे आपल्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे फॅमिली प्लॅनिंगकडे त्यांचे दुर्लक्ष होतं. आता मात्र दीप्तीला आई व्हायचंय. त्याबद्दल वरुणला ति वारंवार समजवते. वरुण मात्र हे सगळं मस्करीत घेत असतो. अखेर दीप्ती वरुणच्या बहिणी (अंजना सुखानी) च्या मदतीने वरुणला डॉ.जोशी दाम्पत्या (आदिल हुसैन-टिस्का चोप्रा) कडे आयव्हीएफ टेस्टच्या सहाय्यानं आपण मुलाला जम्न देऊ शकतो हे पटवून देते. ठरल्याप्रमाणे मिस्टर एण्ड मिसेस बत्रा डॉ. जोशीमकडे आयव्हीएफ टेस्ट करण्य़ासाठी जातात. इथेच खरा गोंधळ होतो. कारण हनी बत्रा (दिलजीत दोसांझ) आणि मोनिका बत्रा (कियारा अडवाणी) या जोडप्याचीही आयव्हीएफ टेस्ट झालेली असते. पण एकसारखच आडनाव असल्यामुळे त्यांच्या ‘स्पम’ची अदलाबदली होते. म्हणजे दिप्तीच्या गर्भात हनीचा आणि मोनिकाच्या गर्भात वरुणचा ‘स्पम’ जातो. हे कळल्यावर या जोडप्यांच्या आयुष्यात भूकंपचं येतो. नंतर काय होतं ? कोणत्या गोष्टींना यांना फेस करावं लागतं ? याची हसवता हसवता डोळ्याच्या पापण्या टचकन ओली करणारी गोष्टी म्हणजे ‘गुड न्यूज’.

सिनेमाची संकल्पना हटके आणि बोल्ड आहे. राज मेहतांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. तरीही संपूर्ण चित्रपट त्यांनी ज्या पध्दतीनं ताळेबंद ठेवलाय ते कमाल. चित्रपटाचा विषय बोल्ड होता, तरीही दिग्दर्शकानं कुठेही कमरेखालचे विनोद, संवाद असणार नाही याची कटाक्षानं काळजी घेतली आहे. सिनेमाचा पहिला भाग मस्त जुळुन आला आहे. अनेक दृश्य तुम्हाला पोट धरुन हसायला लावतात तर काही वन लायनर पंचेस तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात. मध्यंतरानंतर कॉमेडी, इमोशन्सचा उत्तम मिलाफ करण्यात आला आहे. इथेही हा ड्रामा मेलोड्रॅमेटिक होणार नाही याची काळजी राज मेहतानं घेतली आहे. अगदी सफाईदारपणे त्याने हे सगळं हाताळलं आहे. आपली स्वत:ची बायको प्रेग्नंट असतांना दीप्ती बत्राच्या गर्भात आपले स्पम असल्यामुळे तिची जास्त काळजी घेणारा हनी बत्रा. किंवा पदोपदी हनी बत्रा आणि त्याची बायको मोनिका बत्राचा अपमान करणारा वरुण बत्रा. हे सगळं प्रकरण मॅच्युरिटीनं हाताळणारी दीप्ती बत्रा. स्पमची अदलाबदली झाल्यामुळे दोन बायकांच्या मनात चाललेली घालमेल हे दिग्दर्शकानं उत्तम हेरलं आहे.

सिनेमात एवढं छान छान असूनसुध्दा काही गोष्टी सिनेमात प्रकर्षानं खटकतात. दीप्ती आणि मोनिका सातवा महिना असतांना ज्या सफाईदारपध्दतीनं वावरतात ते न पटणारं आहे. सातवा महिना असेल तर कुठलीही स्त्री एवढ्या वेगानं, चपळतेने चालत नाही. तसेच सिनेमाच्या क्लायमॅक्सला करीनाच्या डिलव्हरीच्या वेळेस अक्षयचं तिथं उपस्थित असणं हेही अतिशोयक्ती वाटतं. या काही छोट्या छोट्या गोष्टींवर दिग्दर्शकानं लक्ष द्यायला हवं होतं. स्पमची अदलाबदली झाली तर हा विषय चेष्टेवर न घेता गांभीर्यानं घ्यायला हवा हे दिग्दर्शकानं सिनेमात सांगण्याचा प्रयत्न केलाय. सिनेमाचा विषय खरतर वाढवता आला असता. पण राजनं जास्त फापटपसारा न ठेवता दोन तास दहा मिनिटात सिनेमा आटोपशीर घेतला आहे. राजसोबतच ज्योती कपूरनेच सिनेमाची कथा-पटकथा लिहीली आहे. त्यामुळे हा सिनेमा ताळेबंद ठेवण्यात तिचाही मोठा वाटा आहे.

अक्षय कुमारनं पुन्हा एकदा धमाल केलीय. कॉमेडी असो वा इमोशन सगळ्यामध्येच अक्षयनं बाजी मारली आहे. करीना कपूर खाननं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. कणखर दीप्ती बत्रा तिनं उत्तम रंगवली आहे. कियारा अडवाणी नेहमीसारखीच गोड दिसली आहे. या सगळ्यांमध्ये दिलजीत दोसांझ सरप्राईज पॅकेज ठरला आहे. त्याने संपूर्ण सिनेमात फुल फॉर्मात बॅटींग केली आहे. अक्षयचा कॉमिक टायमिंग सगळ्यांनाच माहिती आहे. पण दिलजीतनं त्याला जोरदार टक्कर दिली आहे. बऱ्याच प्रसंगात तर तो अक्षयवर भारी पडला आहे. टिस्का चोप्रा-आदिल हुसैननंही आपल्या भूमिका चोख बजावलेल्या आहेत. सिनेमाचं संगीत आधीच हिट झालं आहे. ‘सौदा खरा खरा’ आणि ‘चंदीगढ मे’ हे गाणी जबरदस्त हिट झाली आहेत.

एकूणच काय तर हे वर्ष संपता संपता अक्षयनं पुन्हा एकदा प्रेक्षकांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. त्यामुळे कलाकारांचा दमदार अभिनय, उत्तम मांडणी, कसलेलं दिग्दर्शन, हटके विषय यामुळे ही ‘गुड न्यूज’ हवीहवीशी वाटणारी आहे.

‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमासा मी देतोय तीन स्टार्स

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.