दहशतवाद्यांकडून बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची हत्या, बायको – मुलाला संपवलं… एकच वेळी 329 जणांचे मृतदेह समुद्रात दफन

दहशतवाद्यांनी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं तेव्हा... एकच वेळी 329 जणांचे मृतदेह समुद्रात दफन... नक्की घडलेलं तरी काय? अत्यंत भयानक होती घडलेली घटना...

दहशतवाद्यांकडून बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची हत्या, बायको - मुलाला संपवलं... एकच वेळी 329 जणांचे मृतदेह समुद्रात दफन
Indar Thakur
| Updated on: Mar 18, 2026 | 9:46 AM

मृत्यू कोणाला चुकलेला नाही. पण आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आकस्मित निधनाने मोठा धक्का बसतो… असंच काही बॉलिवूडच्या एकाप प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झावं आहे… असा कलाकार ज्याने फक्त अभिनय नाही तर, फॅशन इंडस्ट्रीवर देखील स्वतःची छाप सोडली आणि भक्कम ओळख निर्माण केली. त्याची स्वप्न फार मोठी होती, पण नशिबात मात्र काही वेगळंच लिहिलेलं. त्यामुळे नियतीने देखील अभिनेत्याची साथ दिली नाही. सध्या ज्या अभिनेत्याच्या आयुष्याची चर्चा सुरु आहे, त्याचं नाव इंदर ठाकूर असं होतं. अभिनेत्याचं पूर्ण नाव इंदर हीरालाल ठाकूर असं होतं… इंदर ठाकूर आज असता तर, फक्त अभिनय विश्वच नाही तर, फॅशन इंडस्ट्रीमध्ये देखील मोठे बदल पाहायला मिळाले असते. कमी वयात इंदर ठाकूर याने संपत्ती, प्रसिद्ध कमावलेली, पण फार कमी वयात अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.

1985 मध्ये झालेल्या एका धक्कादायक अपघातात अभिनेत्याचं निधन झालं. इंदर ठाकूर याचा मृत्यू एअर इंडिया विमान अपघातात झाला… ‘नदिया के पार’ सिनेमात दमदार भूमिका साकारणाऱ्या इंदर ठाकूर याने वयाच्या 35 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला… सांगायचं झालं तर, अभिनय विश्वात पदार्पण करण्यापूर्वी केबिन मॅनेजर म्हणून देखील त्यांनी काम केलं आणि प्रिया नावाच्या एअर होस्टेससोबत लग्न केलं… लग्नानंतर दोघांना एका गोंडस मुलाचं जगात स्वागत केली. पण 23 जून 1985 या दिवशी सर्व काही संपलं…

जेव्हा इंदर, पत्नी आणि मुलासह टोरोंटोहून लंडन, इंग्लंडला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट 182 मध्ये चढले, तेव्हा त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा मृत्यू झाला. कॅनडाहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट 182 मध्ये बॉम्बस्फोट झाला, ज्यात विमानातील सर्व 329 लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतेक कॅनेडियन होते. दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला…

दहशतवाद्यांनी विमान लँड होण्याच्या 45 मिनिटांपूर्वीच विमान हवेत असताना बॉम्बस्फोट घडवून आणला. ज्यामध्ये 307 प्रवासी आणि 22 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला… याच हल्ल्यात अभिनेत इंदर ठाकूर, पत्नी आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचं देखील निधन झालं. अभिनेत्याच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली होती, तर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता… फार कमी वयात अभिनेत्याने सिनेविश्वाचाच नाही तर, जगाचा देखील निरोप घेतला.

 

 

Follow Us