AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : दोघांची केमिस्ट्री जाणवायची, शूटिंगपूर्वी ते…नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्याबद्दल प्रसिद्ध लेखकाचं वक्तव्य

Writer On Nana Patekar And Manisha Koirala : नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. एका मुलाखतीत 'अग्नि साक्षी' सिनेमाच्या लेखकानं नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.

Nana Patekar : दोघांची केमिस्ट्री जाणवायची, शूटिंगपूर्वी ते...नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्याबद्दल प्रसिद्ध लेखकाचं वक्तव्य
| Updated on: Oct 18, 2026 | 4:06 PM
Share

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर रोजी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं. नाना पाटेकर यांच्या निधनानं कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांचे अनेक जुने किस्से व्हायरल होतायत. एकेकाळी नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. यावर ‘अग्नि साक्षी‘ सिनेमाचे लेखक रणबीर पुष्प यांनी भाष्य केलेलं.

पार्थो घोष दिग्दर्शित सायकॉलॉजिकल थ्रिलर ‘अग्नि साक्षी’ हा सिनेमा त्या काळातील एक सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटातील नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांची जोडीही सुपरहिट ठरली. या सिनेमाच्या सेटवरच नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला एकमेकांच्या प्रेमात पडले, असं सांगितलं जातं. चित्रपटाचे लेखक रणबीर पुष्प एका मुलाखतीत म्हणाले की, ‘त्यांच्यात काहीतरी होतं. देवालाच ठाऊक, ती मैत्री होती की प्रेम. सेटवर त्यांच्यातील केमिस्ट्री स्पष्टपणे जाणवत होती.’

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत रणबीर यांनी ‘अग्नि साक्षी’ सिनेमाच्या शूटिंगच्या आठवणी सांगितल्या. रणबीर म्हणाले, ‘नाना पाटेकर आणि मनीषा यांच्यात समजूतदारपणा होता. शूटिंगपूर्वी ते सीनवर चर्चा करायचे. पण, त्या दोघांमध्ये मैत्री आणि कामापलीकडे काही होतं का, हे शोधण्याचा मी कधीच प्रयत्न केला नाही. मी नंतर वर्तमानपत्रांमध्ये त्याबद्दल वाचलं, पण मी स्वतः असं काहीही कधी पाहिलं नाही. सहसा, मी माझं काम करायचो, सेटवरचे काही सीन बघायचो आणि निघून जायचो.’

नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांचं नातं

दरम्यान, नाना पाटेकर आणि मनीषा यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘खामोशी: द म्युझिकल’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमामध्ये मनीषानं नाना पाटेकर यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्याच वर्षी ‘अग्नि साक्षी’ प्रदर्शित झाला आणि त्यानंतर १९९८ मध्ये ‘युगपुरुष’ प्रदर्शित झाला. नाना पाटेकर यांच्या आधी, मनीषा कोईराला विवेक मुश्रानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांचा ब्रेकअप झाला. जेव्हा मनीषा आणि नाना एकमेकांना भेटले तेव्हा, त्यांच्यात वयातील अंतर खूप होतं. नाना विवाहित होते. पण, ते पत्नीसोबत राहत नव्हते. ‘अग्नि साक्षी’च्या शूटिंगदरम्यान, नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला अनेकदा सेटवर एकत्र असायचे. मनीषा कोईरालानं त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, पण नाना पाटेकर यांनी नकार दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ते आपल्या पत्नीला घटस्फोट देणार नाहीत. त्यानंतर नाना पाटेकर आणि मनीषा कोईरालाचा ब्रेकअप झाला.

Follow Us
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?