Nana Patekar : माधुरीवर माझं एकर्फी प्रेम होतं, पण ती…, नाना पाटेकरांनी ‘धकधक गर्ल’वर असलेलं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं तेव्हा…, नेमकं काय घडलेलं?

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. एवढंच नाही तर, एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी 'धकधक गर्ल'वर असलेलं प्रेम देखील व्यक्त केलं होत... शिवाय तिच्यासाठी शायरी देखील म्हणून दाखवलेली... त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nana Patekar : माधुरीवर माझं एकर्फी प्रेम होतं, पण ती..., नाना पाटेकरांनी धकधक गर्लवर असलेलं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं तेव्हा..., नेमकं काय घडलेलं?
Nana Patekar
| Updated on: Oct 20, 2026 | 11:12 AM

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची जोडी एकेकाळी मोठ्या पडद्यावर हिट होती. दोघांनी ‘प्रहार: द फाइनल अटॅक’, ‘वजूद’, ‘मोहरे’, ‘परिंदा’, यासारख्या सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्यांच्या सिनेमातील काही आयकॉनीक सीनचे व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नाना पाटेकर यांनी माधुरी हिच्यावर असलेलं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नाना पाटेकर यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

नाना पाटेकरांनी माधुरी दीक्षित हिच्यासाठी व्यक्त केलेल्या भावना

Loading...

नाना पाटेकर म्हणाले, ‘माझं माधुरीवर एकतर्फी प्रेम आहे… स्पष्ट आहे की, मी तिच्यासमोर माझ्या भावना व्यक्त करु शकत नाही… एकेकाळी माधुरीसाठी मी एक शायरी लिहिली होती.., ती आज बोलून दाखवतो…’, सध्या नाना पाटेकरांचा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे.

नाना पाटेकर यांनी माधुरी दीक्षितसाठी केलेली शायरी…

कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम धड़कनों का गीत हो… जीवन का संगीत हो… तुम जिंदगी… तुम मंदगी… तुम रोशनी… तुम ताजगी… तुम हर खुशी….प्यार हो… प्रीत हो… मनमीत हो… आंखों में तुम… यादों में तुम… नींदों में तुम… ख्वाबों में तुम हो…तुम हो मेरी हर बात में… तुम हो मेरे दिन रात में… तुम सुबह में… तुम शाम में…, तुम सोच में…. तुम काम में…, मेरे लिए पाना भी तुम…, मेरे लिए खोना भी तुम…, मेरे लिए हंसना भी तुम…. मेरे लिए रोना भी तुम…और जागना- सोना भी तुम… जाऊं कहीं, देखूं कहीं… तुम हो वहां… तुम हो वहीं… कैसे बताऊं मैं तुम्हें… तुम बिन तो मैं कुछ भी नहीं…

नाना पाटेकर यांचं खासगी आयुष्य

अभिनेता नाना पाटेकर फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयु्ष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिले. लग्नानंतर नाना पाटेकर यांचं पत्नी नीलकांती यांच्यासोबत नातं फार काळ टिकलं नाही. गेल्या 35 वर्षांपासून दोघे विभक्त राहत होते. पण दोघांनी कधीच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला नाही. दरम्यान, नाना पाटेकर यांचं नातं अभिनेत्री मनिषा कोईराला हिच्यासोबत जोडण्यात आलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. आज मनिषा वयाच्या 56 व्या वर्षी देखील एकटीच आयुष्य जगत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us