AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : त्यांचे हात-पाय मोडावे यासाठी मी…नसिरुद्दीन शाह यांच्याबद्दल काय म्हणालेले नाना पाटेकर?

Nana Patekar On Naseeruddin Shah : नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमात नासिरुद्दीन शाह यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलेलं. त्यामुळे सर्वत्र हशा पिकला होता.

Nana Patekar : त्यांचे हात-पाय मोडावे यासाठी मी...नसिरुद्दीन शाह यांच्याबद्दल काय म्हणालेले नाना पाटेकर?
| Updated on: Oct 20, 2026 | 4:27 PM
Share

नाना पाटेकर यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं असून अनेक कलाकार नानांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. अनेक कलाकार नाना पाटेकर यांच्या आठवणी शेअर करत आहेत. तसेच नानांच्या जुन्या मुलाखती व्हायरल होत आहेत. एका जुन्या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी नासिरुद्दीन शाह यांच्याबद्दल भाष्य केलेलं. तीन वर्षांपूर्वी ‘सिंहासन‘ या सिनेमाला 44 वर्षे पूर्ण झाल्यामुळे मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. या कार्यक्रमादरम्यान नाना पाटेकर यांनी नासिरुद्दीन शाह यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलेलं.

काय म्हणालेले नाना पाटेकर?

नाना पाटेकर म्हणालेले की, ‘मी तेव्हा नासिरुद्दीन शाहचा अपघात व्हावा यासाठी नवस केला होता. मी खरंच सांगतो, ‘सिंहासन’ नंतर जब्बार पटेल यांनी मला एकाही चित्रपटात घेतलं नाही. मराठीसाठी ते मोहन आगाशे यांना घेत तसं हिंदीत श्याम बेनेगल, गोविंद निहलानी हे ओम पुरी, नासिरुद्दीन शाह यांच्यासोबत काम करायचे. मी देव मानत नाही, याचं कारण नासिरुद्दीन शाह. तेव्हा तर मी देवाला नवस केलेला की, नासिरुद्दीनला अपघात व्हावा, त्याचा पाय मोडू दे, हात मोडू दे, म्हणजे ते रोल मला मिळतील. म्हणजे याला काहीतरी वाईट होउदे. पण, ते तसं कधीच झालं नाही. तेव्हा माझा देवावरचा विश्वास उडाला.’

दरम्यान, नाना पाटेकर यांना ८ ऑक्टोबर रोजी सकाळी गोव्यातील घरी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथं डॉक्टरांनी त्यांना ४५ मिनिटे सीपीआर दिला, परंतु त्यांना वाचवता आलं नाही. नंतर, अंतिम शवविच्छेदन अहवालात नानांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं घोषित करण्यात आलं आणि यात कोणताही घातपात नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. अहवालात म्हटलं आहे की, हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. पुणे येथील डोंजेमधील फार्महाऊसवर नाना पाटेकर यांच्यावर संपूर्ण शासकीय सन्मानानं अंत्यसंस्कार करण्यात आले.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!