Nana Patekar : ‘जे आहे ते स्वीकारायचं अन्..’, 35 वर्ष नाना पाटेकरांपासून राहिल्या विभक्त, नीलकांती स्पष्टच म्हणालेल्या…

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठीच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली. पण खासगी आयुष्यात त्यांनी अनेक चढ- उतारांचा सामना केला. तब्बल 35 वर्ष नाना पत्नीपासून विभक्त राहिले. यावर नीलकांती यांनी मोठं वक्तव्य केलं होतं.

Nana Patekar : जे आहे ते स्वीकारायचं अन्.., 35 वर्ष नाना पाटेकरांपासून राहिल्या विभक्त, नीलकांती स्पष्टच म्हणालेल्या...
Nana Patekar
| Updated on: Oct 18, 2026 | 8:51 AM

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या आठवणी चाहत्यांसोबत कायम राहतील. नाना पाटेकर यांनी अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन तर केलं, पण खासगी आयुष्यात मात्रा नानांची अनेक चढ – उतारांचा सामना केला. नाना पाटेकर प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोतले, पण खासगी आयुष्यात मात्र त्यांच्या अनेक अडचणी आल्या. मोठे सेलिब्रिटी असताना देखील खासगी आयुष्याचं दुःख त्यांच्यापासून दूर झालं नााही.

रिपोर्टनुसार, नाना पाटेकर तर स्वतःच्या इच्छेने नीलकांती पाटेकर यांच्यासोबत लग्न तर केलं. पण दोघांना एकमेकांचा सहवास फार काळ लाभला नाही. नाना पाटेकर आणि नीलकांती पाटेकर तब्बल 35 वर्ष एकमेकांपासून विभक्त राहिले.  पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही.

Loading...

अनेक ठिकाणी नाना पाटेकर मुलगा मल्हार पाटेकर याच्यासोबत दिसायचे. पण नीलकांती पाटेकर कधीच दिसल्या नाहीत. दरम्यान, एकदा याबद्दल स्वतः नीलकांती म्हणालेल्या. त्यांच्या व्हिडीओ आज नाना पाटेकर यांच्या निधनानंतर व्हायरल होत आहे.

काय म्हणालेल्या नीलकांती पाटेकर

एकदा नीलकांती पाटेकर म्हणालेल्या, ‘जे काही आहे आणि जसं काही आहे ते स्वीकारायचं आणि पुढे चालायचं. पर मागे वळून पाहिल्यानंतर ती कुडकूड जाणवतेच ना…’,  नीलकांती यांचं हे वक्तव्य आता सर्वत्र व्हायरल होत आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर नीलकांती काय म्हणालेल्या, ते आता व्हायरल होत आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर नीलकांती याची पहिली प्रतिक्रिया… 

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर नीलकांती भावूक झालेल्या दिसल्या. तर नीलकांती पाटेकर यांनी फेसबुकवर ‘एक शब्द… निःशब्द…’ अशी मोजक्या शब्दांत पोस्ट शेअर केलेली. त्यांच्या पोस्टची देखील सर्वत्र चर्चा सुरु होती.

एवढंच नाहीतर, नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर याने देखील आई – वडिलांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. अनेक चर्चा रंगल्यानंतर मल्हार म्हणालेला, ‘माझ्या आई – वडिलांचं नातं जवळपास 38 – 39 वर्ष टिकलं. विभक्त झाल्यानंतर देखील त्यांनी त्यांचं चांगले संबंध जपले…  कुटुंबाची परिस्थिती बाहेरुन दिसते तशी नसते, ती वेगळी असू शकते… सोशल मीडियावर जे काही व्हायरल होत आहे, त्यावरुन नात्यांबद्दल निष्कर्ष काढणं हे चुकीचं आहे…’, असं मल्हार म्हणालेला.

 

 

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us