इतकी सुंदर पत्नी की घराबाहेर पडताच गावकऱ्यांची लागली नजर, नवऱ्याने असा केला उपाय की..

इतकी सुंदर पत्नी की शेजाऱ्यांची, दीराची आणि आत्याची तिला नजर लागायची. नवऱ्याने गाण्यातून केला असा उपाय की गाणं ठरलं सुपरहिट.

| Updated on: Oct 14, 2026 | 2:28 PM
1 / 5
सध्या सोशल मीडियावर ‘नस नस क्यों दुखै’ हे ब्रज भाषेतील गाणे चांगलेच लोकप्रिय होत आहे. गावातील सुंदर बहू, तिचे सौंदर्य पाहून तिला लागणारी लोकांची नजर आणि त्यावरून पती-पत्नीमध्ये होणारी मजेशीर नोकझोक या गाण्यात पाहायला मिळते.

सध्या सोशल मीडियावर ‘नस नस क्यों दुखै’ हे ब्रज भाषेतील गाणे चांगलेच लोकप्रिय होत आहे. गावातील सुंदर बहू, तिचे सौंदर्य पाहून तिला लागणारी लोकांची नजर आणि त्यावरून पती-पत्नीमध्ये होणारी मजेशीर नोकझोक या गाण्यात पाहायला मिळते.

2 / 5

सिंपल लूक, खट्याळ संवाद आणि प्रेमळ भांडणामुळे या गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्यावर अनेक जण रील्सही बनवत आहेत. या गाण्यात पत्नी आपल्या पतीकडे शरीरातील वेदनांची तक्रार करते.

3 / 5

आपल्याला नीट हलताही येत नाही, असे ती सांगते. त्यावर पती तिला मजेशीरपणे म्हणतो की, ती इतकी सुंदर दिसते की संपूर्ण गावाची नजर तिलाच लागली आहे. घरातून सजून-धजून बाहेर पडल्यावर गावातील लोक तिच्याकडे पाहतात.

4 / 5

कोणी तिचे कौतुक करते तर कोणी तिच्याकडे लपूनछपून पाहण्याचा प्रयत्न करते. यावरून पत्नीची नाराजी आणि पतीची तिला समजावण्याची पद्धत गाण्यात रंगत आणते.

5 / 5

ब्रज भाषेतील खास शब्द, ग्रामीण जीवनाचे चित्रण आणि पती-पत्नीमधील गोड भांडण यामुळे हे गाणे वेगळे ठरते. सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद आणि त्यावर बनणाऱ्या रील्समुळे ‘नस नस क्यों दुखै’ गाण्याची लोकप्रियता वाढताना दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us