‘अज्ञानी व्यक्ती देशाचं नेतृत्व करत असेल, तर….’, डोळ्यात पाणी आणत नसीरुद्दीन शाह यांचा मोदींवर हल्लाबोल

Naseeruddin Shah : जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यामुळे संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. यावर दिग्गद अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी देखील संताप करत मोदींवर हल्लाबोल केला आहे.

अज्ञानी व्यक्ती देशाचं नेतृत्व करत असेल, तर...., डोळ्यात पाणी आणत नसीरुद्दीन शाह यांचा मोदींवर हल्लाबोल
Naseeruddin Shah
| Updated on: Jul 22, 2026 | 10:11 AM

नीट पेपरफुटी प्रकरणात सुरु झालेलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतर मोर्च्याचं आता एक मोठ्या आंदोलनात रुपांतर झालं आहे. 20 जुलै रोजी ‘चलो संसद’ मोर्चा दरम्यान अनेक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक तरुण, तरुणी जखमी झाले असून त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटी देखील आंदोलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांचं समर्थन करण्यासाठी पोहोचले. आता दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांवर केलेला लाठीचार्ज आणि मारहाणीवर बोलताना नसीरुद्दीन शाह यांनी संताप तर व्यक्त केलाच, पण त्यांच्या डोळ्यातून पाणी देखील आलं,

76 वर्षीय अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांचे डोळे पाणावलेले दिसले. यापूर्वी, नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या दोन मुलांसह जंतर-मंतर येथील ‘सीजेपी’च्या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला होता आणि तेथे विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज ते पाहत होते, असा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता; मात्र, तो व्हिडिओ खरं तर मुंबईत आयोजित एका स्क्रीनिंगचा होता. आता मात्र, नसीरुद्दीन शाह यांनी एक अत्यंत भावूक करणारा व्हिडिओ शेअर केला असून त्याद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे.

व्हिडीओ शेअर करत नसीरुद्दीन म्हणाले, ‘नमस्कार… मी नसीरुद्दीन शाह आज मला दोन गोष्टी सांगायच्या आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, जर एखादी अज्ञानी व्यक्ती या देशाचं नेतृत्व करत असेल, तर साहजिकच त्या व्यक्तीच्या मनात अशी इच्छा निर्माण होईल की संपूर्ण राष्ट्रही अगदी तिच्यासारखंच झालं पाहिजे. म्हणजेच अज्ञानी, समजशक्तीचा अभाव असलेले, अकार्यक्षम आणि निर्दयी.’

”नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ आणि ‘पुणे फिल्म इन्स्टिट्यूट’ अशा दोन नामांकित संस्थांमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलेलं असूनही, अभिनयाबाबत मला जी सर्वात महत्त्वाची शिकवण मिळाली, ती मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडूनच मिळाली. त्यांच्याप्रती माझ्या मनात नितांत आदर आणि जिव्हाळा आहे; मझ्या प्रत्येक श्वासात त्यांच्यासाठी माझे आशीर्वाद आहेत आणि दरवर्षी ‘शिक्षक दिना’च्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो.

शाह पुढे म्हणाले, ‘सध्या माझं मन जड झालं आहे आणि संतापाची भावना देखील आहे की, आमच्या मुलांसोबत त्या गुंडांकडबव कसा अन्याय होत आहे… ते मला अमेरिकन एजंट्सची आठवण करून देतात. चेहऱ्यावर मुखवटे आणि हातात लाठ्या. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांचाही विचार केला पाहिजे आणि हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की, एक दिवस तुम्हालाही तुमच्या कृत्यांचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. मला या सर्व तरुणांना सांगायचं आहे की, धीर सोडू नका. अनेक लोकांचं तुम्हाला समर्थन आहे; अनेकजण तुमच्या पाठीशी उभे आहेत. लढा चालू ठेवा. मला आपल्या देशाच्या तरुणांकडून नेहमीच मोठ्या अपेक्षा राहिल्या आहेत आणि आता त्या अपेक्षा अधिकच दृढ झाल्या आहेत. तुम्ही तुमचा लढा सुरूच ठेवला पाहिजे; आम्ही तुमच्या सोबत आहोत…’, असं देखील नसीरुद्दीन शाह म्हणाले आहेत.

Follow Us